शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

अंबाबाई मंदिराच्या आराखड्याचे आज मुंबईत सादरीकरण

By admin | Updated: June 9, 2017 00:13 IST

अंबाबाई मंदिराच्या आराखड्याचे आज मुंबईत सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आज, शुक्रवारी मुंबईत मुख्य सचिवांसमोर सादर होणार आहे. आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली की त्यावर मुख्यमंत्र्यांच्या पुढील बैठकीत शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे आराखड्याची ही अंतिम परीक्षा असणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रधान सचिवांना आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मुख्य सचिवांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा नगरसेवकांना कळावा यासाठी दोन दिवसांपूर्वी त्याचे सादरीकरण करण्यात आले होते. सुमारे ७० कोटींच्या या आराखड्याला मुख्य सचिवांची प्रशासकीय पातळीवरील मंजुरी मिळाली. पुढे त्यावर मुख्यमंत्री शिक्कामोर्तब करतात. त्यामुळे या सादरीकरणाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे आज, शुक्रवारी आराखड्याची अंतिम परीक्षा आहे. बदलांचा अंतर्भाव होणार : या आराखड्यासंदर्भात यापूर्वी कोल्हापूरच्या जनतेने आणि दोन दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेवकांनीही सूचना मांडल्या आहेत. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा मंदिराच्या सौंदर्याला बाधा ठरू नये, या दृष्टीने विचार करून या सूचनांचा आराखड्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. यात दर्शन मंडपासाठी फरासखान्याच्या विचारासह अन्य बाबींचा समावेश आहे. दरम्यान, जर मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित झाले तर त्या नियमांनुसारही आराखड्यात बदल करावे लागणार आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.