शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या बंदोबस्ताची आखणी शनिवारी करण्यात आली. शनिवारी दुपारी शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक झाली. गणराया अवॉर्ड, विसर्जन मिरवणूक मार्ग, बंदोबस्त, मंडळांच्या बैठका घेऊन जनजागृती व प्रबोधन करण्यासंबंधी चर्चा झाली.यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या बंदोबस्ताची आखणी शनिवारी करण्यात आली. शनिवारी दुपारी शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक झाली. गणराया अवॉर्ड, विसर्जन मिरवणूक मार्ग, बंदोबस्त, मंडळांच्या बैठका घेऊन जनजागृती व प्रबोधन करण्यासंबंधी चर्चा झाली.यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांची दोन महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू आहे. बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक झाली. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या कालावधीच्या बंदोबस्तासंबंधी चर्चा करून त्याप्रमाणे आखणी करण्याचे नियोजन केले. जमाव नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था, मिरवणुकीचे संरक्षण, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी तसेच कोणताही अप्प्रकार टाळण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत, तसेच काही निर्बंधही लादले जाणार आहेत. शून्य पार्किंग, फेरीवालामुक्त मार्ग याबाबत चर्चा करण्यात आली आहे. रस्त्यावरील गुन्हे रोखणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे, यानुसार पोलीस बंदोबस्ताची व्यूहरचना आखली जात आहे. या संपूर्ण बंदोबस्ताची पाहणी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक संजय मोहिते करणार आहेत. नियोजन बैठकीस पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, संजय साळुंखे, निशिकांत भुजबळ, आदी उपस्थित होते.मिरवणूक मार्गाची आखणीमिरवणुकीदरम्यान यावेळी अनेक मार्ग बंद केले जाणार आहेत, तसेच अनेक मार्ग एकदिशा केले जाणार आहेत. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्ग, पंचगंगा घाट व इराणी खण तसेच राजारामपुरी मेनरोड ते राजाराम तलाव या विसर्जन मिरवणूक मार्गावर अगदी सायकललासुद्धा पार्किंग करायला परवानगी नाकारली आहे. त्याबाबत नागरिकांना सतत ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जाणार आहेत. हा संपूर्ण मार्ग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे.विशेष पथकांची नियुक्तीमहिला आणि बालकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, छेडछाडविरोधी पथक, मोबाईल चोरीविरोधी पथक, सोनसाखळी चोरीविरोधी पथक, आदी विशेष पथकेही तैनात केली जाणार आहेत.