शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

जिल्ह्यात आठ लाखांवर वृक्षलागवडीची तयारी

By admin | Updated: June 29, 2016 01:02 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ६ लाख लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असले तरीही प्रत्यक्षात अधिकारी व नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे ८ लाखांवर वृक्ष लागवडीची तयारी केली आहे तसेच २२२२ हेक्टर जमीन क्षेत्रावर सुमारे ५ हजार ८०० साईटवर हे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, दि. १ जुलैला एकाच दिवशी सर्वजण वृक्ष लागवड करणार असल्याने यास एकप्रकारे चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. जनजागृतीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे ६ लाख २५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निश्चित केले असताना प्रत्यक्षात जिल्ह्यातील अधिकारी व नागरिकांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ८ लाख ८ हजार ५७७ खड्डे खोदले असून वृक्षलागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील वृक्षलागवडीचा प्रारंभ दि. १ जुलैला सकाळी ९ वाजता पालकमंत्री, दोन खासदार, सर्व आमदारांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.आठ लाख खड्डे तयारजिल्ह्यात वनविभागाच्यावतीने ३ लाख ७० हजार, सामाजिक वनीकरण ३५ हजार, इतर शासकीय विभाग व खासगी संस्थांतर्फे ४ लाख ३० हजार २७३ असे एकूण ८ लाख ८ हजार ५७७ खड्डे खोदून तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. विजेच्या तारांखाली झाडे लावू नकामहापालिकासह सर्व संस्थांनी ही वृक्षलागवड विजेच्या तारांखाली करू नये तसेच भिंतीच्या शेजारी लावू नयेत, असेही आवाहन डॉ. सैनी यांनी केले आहे. वृक्षदानास प्रतिसादज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अगर अपार्टमेंटमधील नागरिकांनी वृक्षदान जिल्हा प्रशासनाकडे करावेत. या योजनेतून आतापर्यंत २००० रोपे मिळाली आहेत. दहापेक्षा जादा रोपे देणाऱ्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार असल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले.इचलकरंजी ग्रीन सिटीकोल्हापूर शहराच्यापाठोपाठ इचलकरंजी शहरातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार असून हे शहर ग्रीन सिटी करण्यात येणार असल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले.