शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

प्रणयची आत्महत्या ब्लॅकमेलिंगमधूनच

By admin | Updated: November 14, 2014 00:14 IST

गूढ उलगडले : सावंतवाडीतील युवकाला अटक

सावंतवाडी : मळगाव आजगावकरवाडीतील प्रणय आजगावकर याच्या आत्महत्येचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही आत्महत्या एकतर्फी प्रेमातून प्रियकराला सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या उद्देशातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वरुण विजय वाडकर (वय २८, रा. जुनाबाजार, सावंतवाडी ) याला अटक केली आहे. मात्र, प्रणयला धमकी देणारा वरूणाचा मित्र अजून खुलेआम फिरत असल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मळगाव आजगावकरवाडीतील प्रणय श्रीधर आजगावकर याने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बुधवारी पोलिसांनी प्रणयचे प्रेम असलेल्या मुलीची चौकशी करत तिचा जबाब नोंदवला. त्यातच आत्महत्येनंतर वरूण हा मुंबईला पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांसमोरच्या अडचणी आणखी वाढत जात होत्या. तर दुसरीकडे प्रणयच्या नातेवाईकांनीही वरूण याला लवकर अटक करा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी प्रणय याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरूण वाडकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वरूण हा विवाहित असून त्याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला आहे. सकाळी जेव्हा पोलीस वरूणच्या घरी गेले तेव्हा वरूण याच्यासह त्याची पत्नी घरी एकटीच होती. तिला वरूणचा हा प्रकार कळल्यानंतर अश्रू आवरणे कठीण झाले होते.प्रणयच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरूण वाडकरला ताब्यात घेतले आहे. मात्र, प्रणयला प्रत्यक्ष घरी जात धमकी देणारा कोण? याचाही शोध घ्या आणि त्याला तातडीने अटक करा, अशी मागणी मळगाव ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या गुन्ह्यात मोठी कार वापरण्यात आली आहे. ती कार कोणाची आहे, याचाही शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी न्याय दिला, असे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी सांगितले. मित्राला पाठवून मारण्याची धमकीप्रणयला भेटत असल्याने वरूण हा चिडायचा. एके दिवशी वरूणने आपल्या मित्राला पाठवून प्रणयला धमकी दिली होती. पुन्हा मला भेटू नको, असे सांगितले होते. तसेच पंधरा दिवसांपूर्वी वरूणने स्वत:च्या मोबाईलवरूनही प्रणयला फोन केला व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याबाबत प्रणयने मला सांगितले होते. त्यावरून याचा जाब वरूणला विचारला होता, असेही प्रणयच्या प्रेयसीने पोलिसांना सांगितले.आत्महत्येपूर्वी प्रणयने व्यक्त केली भेटण्याची इच्छामंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रणयने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दुपारी परीक्षा असल्याने मी त्याला भेटायला गेली नाही. सोमवारी सायंकाळीही त्याने मला फोन केला होता. त्यावेळीही प्रणय हा वरूणबद्दलच बोलला. तसेच तो शिव्या घालत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)