शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ, जिल्ह्यात ३५ जणींनी घेतला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकीकडे केंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांची गर्दी होत असताना दुसरीकडे गर्भवती महिलांनी याकडे पहिल्या आठवड्यात पाठ ...

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकीकडे केंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांची गर्दी होत असताना दुसरीकडे गर्भवती महिलांनी याकडे पहिल्या आठवड्यात पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या सोमवारी शहर, जिल्ह्यात मिळून ३५ गर्भवतींनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे. ही लस गर्भवती महिला व बालकांसाठीही पूर्णत: सुरक्षित असून, या महिलांनी स्वत:च्या व बालकाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १२ लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे, यात ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. सर्वसामान्य नागरिक लसीकरणासाठी धडपडत आहेत पण लस मिळत नाही, अशी स्थिती असताना गर्भवती महिलांनी मात्र भीतीने याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून ५ हजार २३६ गर्भवतींनी लसीसाठी आपल्या नावाची नोंदणी केली होती. लसीकरणासाठी गर्भवतींची धावपळ होऊ नये म्हणून प्रशासनाने दर सोमवारी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातच लस देण्याची सोय केली आहे. सोमवारी (दि. १९) याची सुरुवात झाली. यादिवशी शहर, जिल्हा मिळून १०० महिलांचे लसीकरण करण्यात येणार होते, पण केवळ कोल्हापूर शहरात पंचगंगा हॉस्पिटलमध्ये ३५ गर्भवतींनी लस टोचून घेतली. जिल्ह्यातून या लसीकरणाला प्रतिसाद मिळालेला नाही.

---

आई आणि बाळही सुरक्षितच...

गायनॅक असोसिएशनने यापूर्वीच गर्भवतींना लस घेण्याविषयी सांगितले होते. मात्र, आयसीएमआरने त्यावेळी परवानगी दिली नव्हती जी आत्ता मिळाली, त्यामुळे थोडा संंभ्रम असण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेची प्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली असते, त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभवतो. यापासून स्वत:सह बाळाचा बचाव करायचा असेल तर लस घेणे गरजेचे आहे. महिला तर संसर्गापासून दूर राहतेच पण बाळामध्येही ॲन्टिबॉडीज तयार होऊन त्याची प्रतिकारक्षमता वाढते.

- डॉ. मंजुळा पिशवीकर (स्त्रीरोगतज्ज्ञ)

---

कोरोना लस गर्भ‌वती व बाळासाठी एकदम सुरक्षित असून, ती गरोदरपणाच्या कोणत्याही काळात घेता येते. लसीबद्दल सर्वसामान्य नागरिकांना जे नियम लागू आहेत, तेच या महिलांसाठीही आहेत. गरोदरपणात ज्या अन्य प्रकारच्या लसी घेतल्या जातात त्याचप्रमाणे ही लसदेखील घ्यावी.

- डॉ. फारुख देसाई (लसीकरण अधिकारी)

---

प्रशासनाचे उद्दिष्ट्य

तालुका : गर्भवती महिला

आजरा : १ हजार ८५०

भुदरगड : २ हजार ७१०

चंदगड : ३ हजार १८१

गडहिंग्लज : ३ हजार ५६७

गगनबावडा : ६४२

हातकणंगले ८ हजार १२४

कागल : ४ हजार १३४

करवीर : ८ हजार ७७७

पन्हाळा : ४ हजार ६०४

राधानगरी : ३ हजार ५८७

शाहूवाडी : ३ हजार २३९

शिरोळ : ५ हजार २५६

एकूण : ४९ हजार ६५९

नगरपालिका : ८ हजार ५३२

कोल्हापूर महापालिका : १० हजार १५६

एकूण जिल्हा : ६८ हजार ३४७

---

दोन जीवांची काळजी

आम्ही गावातल्या डॉक्टरांना लसीबद्दल विचारले होते, त्यावेळी त्यांनी आत्ताच घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सांगितले. त्यामुळे मी अजून कोरोना लस घेतलेली नाही. डॉक्टरांनी सांगितले तर लस घेईन.

- शीतल मिसाळ (मुरगुड)

--

ही लस नवीन आहे, ती गरोदरपणात घ्यावी की नाही, यावर थोडा संभ्रम होता. त्यामुळे घराबाहेर न पडता तब्येतीची काळजी घेत आहे. आता लसीकरण सुरू झाले आहे, त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच लस घ्यायची की नाही, हे ठरवेन.

- नेहा निकम (शनिवार पेठ)

--