शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

अचूक वेध घेणारा आघाडीपटू

By admin | Updated: January 4, 2017 00:31 IST

अजय (राजू) पाटील

अजयने सेंटर फॉरवर्ड ही महत्त्वाची जागा आपल्या कौशल्याने कायमच सांभाळली. महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धा गाजवल्याने त्याची विद्यापीठ संघात निवड झाली होती. आंतरजिल्हा स्पर्धा, राज्य स्पर्धा, रोव्हर्स चषक, त्याचबरोबर अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे.अजय (राजू) हरिश्चंद्र पाटील याचा जन्म १७ जून, १९७२ रोजी कोल्हापुरात झाला. तो संध्यामठ गल्लीत राहात होता. त्यामुळे रंकाळ्याचे पाणी आणि गल्लीतील फुटबॉल खेळाची चर्चा अजयसारख्या लहान मुलांना स्वस्थ बसू देत नसे. दिनकरराव शिंंदे विद्यामंदिरमध्ये शिकत असतानाच अजय टेनिसबॉलने खेळू लागला. गल्लीतच असणारे शिवाजी मराठा हायस्कूलचे मैदान सकाळ - सायंकाळ या बालचमंूनी भरगच्च भरलेले असे. त्यांच्या स्पर्धा अत्यंत उत्साहवर्धक असत. अजय या स्पर्धांत आघाडीवर होता. लहानपणी कोणीही न शिकविता हाफ व्हॉली, फुल्ल व्हॉली, हेडिंंगचे प्रकार अजय आपसूक शिकला. भरपूर खेळ, व्यायाम, पोहणे यामुळे अजय लहानपणीच काटक व चपळ बनला.अजयने महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला पण अजयला महाराष्ट्र हायस्कूलच्या संघातून खेळता आले नाही. तथापि तो जेव्हा ११ वी, १२ वीसाठी खराडेंच्या उदयसिंंगराव गायकवाड कॉलेजमध्ये दाखल झाला; त्यावेळी त्या कॉलेजच्या १९ वर्षांखालील शासकीय स्पर्धांत त्याच्या खेळास बहर आला. त्याची राज्य संघात निवड झाली होती. यानंतर अजयने न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या संघात सेंटर फॉरवर्ड या जागी त्याचा खेळ सर्वांना आकर्षित करून गेला.खऱ्या अर्थाने अजयने वयाच्या १७ व्या वर्षापासून मोठ्यांच्या ( सीनिअर संघ ) स्पर्धांत भाग घ्यावयास सुरुवात केली. संध्यामठ फुटबॉल संघातून तो १९८९ पासून २०१४ पर्यंत तब्बल २५ वर्षे खेळला व त्यानंतर गोल्डस्टार या फुटबॉल संघातून १ वर्ष अशी एकूण २६ वर्षे त्याने फुटबॉलसाठी दिली. फुटबॉल खेळातील तांत्रिक बाजूवर त्याची पूर्ण हुकमत होती. त्याचे बॉल ड्रिबलिंंग पाहण्यालायक होते. अजय संध्यामठ संघातून खेळत असताना त्याने अनेक स्पर्धा गाजविल्या. १९९६ साली चंद्रपूर येथे झालेल्या आंतरजिल्हा स्पर्धांत कोल्हापूर जिल्हा संघात त्याची निवड झाली होती. अखिल भारतीय मदर तेरेसा चषक स्पर्धेकरिता जालना येथे त्याची निवड झाली.रोव्हर्स मिनी स्पर्धा, नाशिक येथे झालेली अखिल भारतीय महापौर चषक स्पर्धा नहान (हिमालय प्रदेश) येथे झालेल्या राकेशमेमोरियल फुटबॉल स्पर्धा, शिवाजीराव भोसले चषक आदी स्पर्धांमधून त्याने आपले कौशल्य दाखविले व यातील अनेक स्पर्धा गाजविल्या.न्यू कॉलेजच्या संघात सेंटर फॉरवर्ड या महत्त्वाच्या प्लेसवर त्याची निवड होत असे. विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेत खेळल्याने त्याची १९९५ साली शिवाजी विद्यापीठ संघात आंतर विद्यापीठ सामने खेळण्याकरिता निवड झाली होती. ग्वाल्हेर येथे झालेल्या सामन्यात अजयने चांगली कामगिरी केली. अजयला एका सामन्यातील त्याच्या कामगिरीची अजूनही आठवण आहे. २००४ मध्ये स्थानिक स्पर्धांत दिलबहार व संध्यामठ यांच्यादरम्यान सामना रंगला होता. एका निर्णायक क्षणी फुटबॉलमधील एक अत्यंत अवघड अशा बायसिकल किकच्या साहाय्याने अजयने गोल केला. हा क्षण कायम त्याच्या स्मरणात राहिला.अजय संस्थानकाळातील शिवाजी तरूण मंडळाचे खेळाडू कै. शामराव सरनाईक यांचा नातू व प्रसिध्द खेळाडू कै. उमेश सरनाईक यांचा भाचा होय. अजयच्या २६ वर्षांच्या काळात मैदानावर खेळत असताना कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य, असभ्य वर्तन, भांडण-मारामारी असला प्रकार त्याच्याबाबत घडलेला नाही. --ल्ल प्रा. डॉ. अभिजित वणिरे(उद्याच्या अंकात : शरद पोवार)