शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांवर पूर्वनियोजित हल्ले

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

सरकारला अहवाल देणार : मुनाफ हकीम यांचा आरोप

कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी विशिष्ट समाजावर झालेले हल्ले हे विशिष्ट हेतूने आणि पूर्वनियोजित होते, या निष्कर्षापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोग पोहोचला असून, या हल्ल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारला लवकरच देण्यात येईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात ज्या जिल्ह्यात विशिष्ट समाजावर हल्ले झाले त्या त्या जिल्ह्यात जाऊन आयोगाने माहिती घेतली. आज मुनाफ हकीम यांच्यासह आयोगाचे सचिव हुसेन मुजावर, डॉ. दत्तात्रय गायकवाड (पुणे), डॉ. मुमताज सय्यद (मुंबई), सुरजितसिंग खुंगर (औरंगाबाद) या सदस्यांनी कोल्हापुरातील दुर्घटनाग्रस्त भागात पाहणी केली. त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी श्रीमंत शाहू महाराज, प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांची भेट घेतली व त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना हकीम म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांच्या विटंबनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक, लुटमार, जाळपोळ अशा अनुचित घटना घडल्या आहेत. राज्यात जेथे अशा घटना घडल्या, त्या पाहिल्या असता या घटना पूर्वनियोजित होत्या. कारण या घटनांमध्ये विशिष्ट समाजालाच टार्गेट करण्यात आले आहे. सर्वत्र एकाच पद्धतीने हल्ले झाले आहेत. राज्यात यापूर्वी प्रार्थनास्थळांवर कधीही हल्ले झाले नव्हते; परंतु १६ ते २१ वयोगटांतील तरुणांना संघटित करून त्यांना विघातक मार्गाकडे वळविण्यात आले. जर अशा वयोगटांतील तरुणांची नावे पोलीस दफ्तरी नोंद झाली, तर त्यांच्या रोजगाराचा, नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे की काय, अशी शंका येते. राज्यात जरी शांतता असली, तरी अल्पसंख्याक समाज आजही दहशतीखाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. म्हणून प्रतिमा विटंबना करणाऱ्यांचा शोध लावून पुन्हा समाजात अशांतता निर्माण होणार नाही, याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे, अशी सूचनाही हकीम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)