शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या एकतेसाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना : कोल्हापूर चर्चमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:43 IST

कोल्हापूर : देशाच्या एकतेसाठी प्रार्थना करीत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण मंगळवारी धार्मिक वातावरणात आणि उत्साहात ख्रिस्ती ...

ठळक मुद्देनाताळनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : देशाच्या एकतेसाठी प्रार्थना करीत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण मंगळवारी धार्मिक वातावरणात आणि उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.

गेले आठवडाभर सुरू असलेली कॅरोल सिंगिंगची धूम, विविध कार्यक्रमांची रेलचेल, नवीन कपडे घालून प्रार्थनेसाठी आलेले नागरिक, एकमेकांना देण्यात येणाऱ्या शुभेच्छा, यामुळे चर्च आणि परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण होते.

शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर चर्च, ब्रह्मपुरी येथील सुवार्तांचे पवित्र मंदिर या चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन केले होते. गेल्या १५ दिवसांपासून ााताळची लगबग सर्वत्र जाणवत होती. तीन दिवसांपूर्वी कॅरोल सिंगिंगला सुरुवात झाली. क्वायर गु्रप घरोघरी जाऊन नाताळची गाणी गात होते. सोमवारी रात्री १२ वाजता फटाके वाजवून नाताळ सणाचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या भक्ती उपासनेला सुरुवात झाली.

न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही उपासनेवेळी रेव्ह. जे. ए. हिरवे, रेव्ह. डी. बी. समुद्रे यांनी नाताळचा संदेश दिला. विक्रमनगर चर्चमध्ये रेव्ह. आर. आर. मोहिते, रेव्ह. संजय धनवडे यांनी भक्ती उपासना केली. नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, केडीसी बँक येथे रेव्ह. भालचंद्र मोरे यांनी संदेश दिला. आॅल सेंटस् चर्च, तसेच ब्रह्मपुरी येथील सुवार्तिकांचे पवित्र मंदिर येथे रेव्ह. गोगटे संदेश दिला.सर्व चर्चमध्ये सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांची गर्दी दिसत होती. नवे कपडे घालून आलेल्या अबालवृद्धांचा उत्साह यावेळी दिसून येत होता. आणखी आठवडाभर शहरासह जिल्ह्णात नाताळचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

कळंबा कारागृहात कैद्यांसाठी प्रार्थनावायल्डर मेमोरियल चर्चच्या वतीने मंगळवारी सकाळी कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या सुधारणेसाठीही प्रार्थना करण्यात आली. तसेच समाजातील गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.कोडोली चर्च परिसरात विविध कार्यक्रमकोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे मंगळवारी नाताळ मोठ्या उत्साहात साजरा झाला. नाताळनिमित्त चर्च विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. १९१९ मध्ये चर्चची भव्य अशी इमारत बांधण्यात आली आहे. तेंव्हापासून कोडोलीसह परिसरातील विविध गावांतील ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये एकत्र येतात. सकाळी केसीसी चर्चच्या वतीने, तर दुपारी केडीसीच्या वतीने भक्ती घेतली. यावेळी इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळपासून दान अर्पण करण्याकरिता ख्रिश्चन बांधवांबरोबरच विविध समाजातील लोक आले होते. यामध्ये अन्न, धान्य, वेगवेगळ्या वस्तू, कपडे यांचे दान जमा झाले. या दानाचा लिलाव रात्री करण्यात येतो. चर्च परिसरात विविध प्रकारचे पाळणे, मिठाई व खाद्यपदार्थांचे तसेच मनोरंजनाचे स्टॉल उभारण्यात आले होते.