श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रकाश पाटील यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रमात नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव व शिक्षक आ.प्रा जयंत आसगावकर होते.
यावेळी नरके म्हणाले, सांगरूळ शिक्षण संस्थेचा शैक्षणिक व क्रीडा आलेख उंचावण्याचे काम पाटील यांनी केले. अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण करताना गुणवंत विद्यार्थीही तयार केले. आता यापुढील निवृत्तीचा काळ प्रकाश पाटील यांनी आपल्या कुटुंबासाठी व राजकीय कारकीर्दीसाठी द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिक्षक आ. प्रा जयंत आसगावकर म्हणाले, प्रकाश पाटील यांनी आता कुटुंबासाठी वेळ देताना सामाजिक सामाजिक कार्यातही भाग घ्यावा व सांगरूळ शिक्षण संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. यावेळी वाकरे पोलीस पाटील सुरेश पाटील, राजू मुल्लानी, मुख्याध्यापक भगाटे, संजय पाटील उपस्थित होते.
फोटो
:
श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रकाश पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक आ. प्रा. जयंत आसगावकर, सुरेश पाटील.