शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘वैभव’ कलापथकाचे प्रकाश हिलगे यांचे निधन

By admin | Updated: June 25, 2014 01:13 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक, अभिनेता, निर्माता

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक, अभिनेता, निर्माता व वैभव कलापथकाचे गाजलेले कलाकार प्रकाश महादेव हिलगे (वय ५९) यांचे आज, मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने कोल्हापुरातील आझाद गल्लीतील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजय, चार विवाहित बहिणी, पुतणे असा बराच मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी नऊ वाजता आहे.हिलगे बंधू मूळचे करवीर तालुक्यातील कसबा बीडचे. शालेय वयातच प्रकाश हिलगे यांनी किरण मेळा, विश्वभारती संगीत मेळा, अंकित मेळ्यात काम करून आपल्यातील कलाकाराची ओळख करून दिली. भाऊ सुभाष हिलगे, अनिल हिलगे यांच्यासह त्यांनी १९६८ मध्ये ‘वैभव कलादरबार’ची स्थापना केली. महाराष्ट्रात या वैभव कलादरबारचे कार्यक्रम होत असत. प्रकाश हिलगे या नावांवरच तो कार्यक्रम चालत असे. तो पाहण्यासाठी तरुणाईच्या उड्या पडत. त्यांनी महाराष्ट्रात, कर्नाटक, तमिळनाडू ,केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश येथे दहा हजारांहून अधिक स्टेज शो केले. प्रकाश हिलगे यांच्या चॅलेंजिंग थाळीनृत्य व समईनृत्याची ख्याती सर्वत्र होती. एकेकाळी महाराष्ट्रात विठाबाई भाऊ मांग, काळूबाळू यांचा तमाशा व हिलगे बंधूंचे वैभव कलापथक याची मोठी क्रेझ होती.हिलगे यांनी २००१ मध्ये वैभव मराठी चित्रपट संस्था काढली. या संस्थेद्वारे त्यांनी ‘माहेरची पाहुणी’ चित्रपट निर्मिती केली. महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तीन पारितोषिके मिळाली. त्यांनी ‘भाजीवाली सखू, हवालदार भिकू’ हा विनोदी चित्रपटही निर्माण केला.