शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप स्पोर्टस्, आर.सी.एफ. विजयी

By admin | Updated: April 7, 2016 00:35 IST

व्हीआयपी चषक क्रिकेट

कोल्हापूर : फायटर्स क्लब व मॅक्सवेल इंडस्ट्रीज, मुंबई यांच्यावतीने आयोजित ‘व्हीआयपी चषक’क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात प्रदीप स्पोर्टस् संघाने भिडे स्पोर्टस् संघावर ८ गडी राखून, तर आर.सी.एफ. मुंबई संघाने शाहूपुरी जिमखाना संघावर १२६ धावांनी विजय मिळविला. शास्त्रीनगर मैदानावर प्रदीप स्पोर्टस् विरुद्ध भिडे स्पोर्टस् यांच्यामध्ये सामना खेळविण्यात आला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भिडे स्पोर्टस्ने २९ षटकांत सर्वबाद १९८ धावा केल्या. यामध्ये अवधूत पाटील याने ५१, इंद्रजित खडकेने ३४, तर तुषार पाटीलने २८ धावा केल्या. गोलंदाजी करताना प्रदीप स्पोर्टस्कडून सिद्धार्थ घुले व अमित कदम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना प्रदीप स्पोर्टस्कडून १९.४ षटकांत दोन गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. यामध्ये प्रेम साळवी याने ८५ धावा केल्या, तर करण मोनिशने नाबाद ६७ धावा केल्या. गोलंदाजी करताना भिडे स्पोर्टस्कडून मिलिंद गायकवाड, तुषार पाटील यांनी प्रत्येक एक गडी बाद केला. शाहूपुरी जिमखाना येथे आर.सी.एफ. मुंबई विरुद्ध शाहूपुरी जिमखाना यांच्यामध्ये सामना खेळविण्यात आला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आर.सी.एफ. मुंबई संघाने ३७.१ षटकांत सर्वबाद २४३ धावा केल्या. यामध्ये अनुकर सिंघ याने ५२, रवी सोळंखीने ४२, सिद्धांत आधातरावने ४०, अभिषेक श्रीवास्तवने ३४ धावा केल्या. गोलंदाजी करताना शाहूपुरी जिमखाना संघाकडून आकाश पाटील, अजित बागडी आणि शुभम रणावरे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी संघाने २९ षटकांत सर्वबाद ११७ धावांपर्यंतच मजल मारली. यामध्ये रवी पाटील, महेंद्र शिवसरण व दीपक हत्तीकरने प्रत्येकी १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना आर.सी.एफ. संघाकडून जयमित टेलर याने तीन, तर अनकुर सिंहने दोन गडी बाद केले.