शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

प्रदीप देशपांडे नवे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची बृहन्मुंबईला बदली

By admin | Updated: December 4, 2015 00:55 IST

कोल्हापूरच्या मातीतच शिकलो : प्रदीप देशपांडे

कोल्हापूर : अवैध धंद्यांना चाप बसविणारे, जिल्हा पोलीस दलात दबदबा निर्माण केलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची गुरुवारी बृहन्मुंबई उपायुक्तपदी बदली झाली. डॉ. शर्मा यांच्या जागी नाशिक येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची नूतन पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.कोल्हापूर पोलीस दलात ३० वे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. मनोजकुमार शर्मा यांची १९ फेबु्रवारी २०१४ ला नियुक्ती झाली होती. त्यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू राहतील, त्या ठाण्याच्या निरीक्षकाला जबाबदार धरत कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सांगितले. त्यानंतर ३१ मे २०१४ ला रात्री कोल्हापुरात शिवाजी चौकात झालेला हिंदू-मुस्लिम तणाव त्यांनी शांतपणे हाताळून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. गतवर्षी व यावर्षीचा गणेशोत्सव त्यांनी शांततेत पार पाडला. त्याचबरोबर यावेळेला एप्रिल-मे २०१५ मध्ये ज्या पोलिसांच्या निवृत्तीला तीन वर्षे शिल्लक आहेत, अशा पोलिसांना त्यांच्या तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बदली केली व पोलीस बदल्यांत पारदर्शीपणा आणला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा २०१४ व कोल्हापूर महापालिका २०१५ च्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था बिघडू दिली नाही. त्यांच्या चोख बंदोबस्तामुळे सर्व निवडणुका शांततेत पार पडल्या. दोन आठवड्यांपूर्वी कसबा बावडा येथील कवायत मैदानावरील पोलीस क्रीडा स्पर्धा त्यांच्या नियोजनाखाली झाली. गेल्या महिन्यात दहाहून अधिक मटकाचालकांवर जिल्ह्यात हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवून कारवाई केली. त्यानंतर मागील आठवड्यात (पान ८ वर)मी बदलीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याकडे विनंती अर्ज केला होता. त्यानुसार ही बदली आहे. २० महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कामाबद्दल समाधानी आहोत. लवकरच मी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.- डॉ. मनोजकुमार शर्माकोल्हापूरच्या मातीतच शिकलो : प्रदीप देशपांडेज्या शहरात आपण शिकलो, आयुष्यात काही तरी करून दाखविण्याचे स्वप्न पाहिले, त्याच शहरातील सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. माझ्या दृष्टीने यासारखा मोठा स्वप्नपूर्तीचा आनंद दुसरा नाही, अशा भावना नवे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. अंबाबाईची सेवा करण्याची संधीच मला मिळाली असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली. - प्रदीप देशपांडे सध्या हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेले आहेत. आज, शुक्रवारी पोलीस महासंचालकांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर कोल्हापुरात कधी रूजू होणार यासंबंधीची स्पष्टता होईल, असे त्यांनी सांगितले.शहरातील व्हिडिओ गेमच्या नावाखाली चालणाऱ्या जुगारअड्ड्यावर छापे टाकून कारवाई केली. दरम्यान, १६ फेबु्रवारी २०१५ ला कोल्हापुरात भाकपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. त्यावेळी त्यांनी येथील परिस्थिती शांतपणे हाताळली. गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ ते पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले.दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ‘घरचा रस्ता...!’२० महिन्यांपूर्वी आलेले डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी चुकीच्या कामाबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करत बदली केली. त्यांच्या कालावधीत त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत जरब निर्माण केली.शर्मा यांच्या कार्यकाळात कळे पोलीस ठाणे...जिल्ह्यात सध्या २९ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी कळे पोलीस ठाणे हे २९ वे ठाणे आहे. पाच महिन्यांपूर्वीच पन्हाळा पोलीस ठाण्यांतर्गत कळे पोलीस ठाण्याचे डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी उद्घाटन केले. त्याचबरोबर सीसीटीएनएस (आॅनलाईन पोलीस डायरी) ही अत्याधुनिक पद्धत आणून कामात पारदर्शकता आणली.पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चा...गुरुवारी दुपारी कसबा बावडा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या बदलीची चर्चा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. यावेळी शर्मा यांच्या बदलीचा अनेकांना धक्का बसला. अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंबई : चार पोलीस अधीक्षक व उपआयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर गृहविभागाने गुरुवारी डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले. प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे नाशिक विभागाचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या जागी वाशिमच्या अधीक्षक विनिता साहू यांची बदली झाली आहे. त्याशिवाय नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एम. के. भोसले यांची मुंबईला, तर भंडाऱ्यांचे पोलीस प्रमुख डी. के. झळके यांची वाशिमच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या मातीतच शिकलोकोल्हापूर : ज्या शहरात आपण शिकलो, आयुष्यात काही तरी करून दाखविण्याचे स्वप्न पाहिले, त्याच शहरातील सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. माझ्या दृष्टीने यासारखा मोठा स्वप्नपूर्तीचा आनंद दुसरा नाही, अशा भावना नूतन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. अंबाबाईची सेवा करण्याची संधीच मला मिळाली असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली. देशपांडे कुटुंबीय मूळचे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूरला झाले. त्यांच्या आई प्राथमिक शिक्षिका होत्या. सिव्हील पदविका केल्यानंतर ते पंढरपूर नगरपालिकेत शहर अभियंता म्हणून रूजू झाले; परंतु त्यांचे मन त्यात रमले नाही. त्यांनी पुढे शिक्षण चालू ठेवले. शिवाजी विद्यापीठातून ते एम. ए. झाले. विद्यापीठाच्या ग्रंथालयातच बसूनच त्यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या सेवेची सुरुवात अमरावतीला झाली. त्यानंतर गेली सव्वीस वर्षे ते या सेवेत आहेत. सध्या ते नाशिकला राज्य गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक आहेत.