शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा, खेळाडूंना तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:43 IST

कोल्हापूर : शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा. मनाला शक्तिशाली बनवा, असा सल्ला तज्ज्ञ डॉ. संदीप चौधरी, स्वरूप सावनूर ...

ठळक मुद्देआपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा, खेळाडूंना तज्ज्ञांचा सल्लाकेएसएच्यावतीने ऑनलाईन कार्यशाळा

कोल्हापूर : शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा. मनाला शक्तिशाली बनवा, असा सल्ला तज्ज्ञ डॉ. संदीप चौधरी, स्वरूप सावनूर यांनी मंगळवारी कोल्हापुरातील खेळाडूंना दिला.येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने (केएसए) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी फिटनेस अँड स्पोर्टस्‌ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात १३९४ खेळाडू, प्रशिक्षक, पालक सहभागी झाले. अध्यक्षस्थानी ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पोवार आणि तायक्वॉंदोेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे होते.

कोविडनंतर नव्याने सरावाला सुरुवात करताना पहिल्यांदा आपली शारीरिक क्षमता तपासावी. कारण, शरीरामधील स्नायू आकसण्यासह सहनशक्ती आणि क्षमता, गती कमी झालेली असणार, वजन कमी किंवा जास्त झालेले असणार आहे. त्यामुळे मैदानावर येताना घाई-गडबड न करता रिकव्हरी केली पाहिजे. त्यासाठी ४० ते ५० टक्के या पद्धतीने सराव करावा. सरावाचे वेळापत्रक करावे. दुखापती टाळण्यासाठी योग्य पद्धतीने वॉर्मअप, स्ट्रेचिंग, कुलडाऊन, हायड्रेशन, न्यूट्रिशन, प्रॉपर टेक्निकचा वापर करावा, असे ‌भारतीय हॉकी संघाचे माजी फिजिओथेरिपिस्ट डॉ. संदीप चौधरी यांनी सांगितले. कोविडमुळे मानसिक, शारीरिकदृष्ट्या खेळाडूंच्यामध्ये आलेले काही नैराश्य कसे कमी करता येईल यासाठी तज्ज्ञांसमवेत संवाद साधणे गरजेचे होते. त्यामुळे केएसएने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केल्याचे संस्थेचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मधुरिमाराजे छत्रपती यांनी आभार मानले. प्रथमोपचारासाठी सीपीसीआर कोर्स आणि पालकांसाठी कार्यशाळा लवकर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केएसएचे फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी सूत्रसंचालन केले.आत्मविश्वास, सुसंगती वाढवासतरा वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप भारतीय फुटबॉल संघाचे मेंटल कंडिशनिंग अँड पिक परफॉर्मन्स प्रशिक्षक डॉ. स्वरूप सावनूर यांनी खेळाडूची मानसिकता या विषयावर संवाद साधला. कोविडमुळे सध्या खेळाडूंचे मन विचलित झाले आहे. त्याला योग्य दिशा द्यावी. मानसिकता, आत्मविश्र्वास, कामगिरीतील सुसंगती वाढविली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर