शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅक्टिस क्लब उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 9, 2016 00:56 IST

नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा : फुलेवाडीवर सडनडेथने मात

कोल्हापूर : नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात प्रॅक्टिस क्लबने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर सडनडेथने मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर शुक्रवारी प्रॅक्टिस क्लब व फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात उपांत्यपूर्व सामना झाला. सामना चुरशीचा होणार ही अपेक्षा धरून मोठ्या प्रमाणात फुटबॉल रसिकांनीही सामना पाहण्यास गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. ‘प्रॅक्टिस’कडून योगेश कदम, सुशांत अतिग्रे, ओंकार पाटील, इंद्रजित मोंडल, वैभव राऊत, अजिंक्य गुजर यांनी अनेक चाली रचल्या. मात्र, फुलेवाडी संघाच्या भक्कम बचावफळीने त्या परतावून लावल्या, तर फुलेवाडी संघाकडून करण चव्हाण-बंदरे, रोहित मंडलिक, कपिल साठे, तेजस शिंदे, रोवन परेरा यांनी खोलवर चढाया करीत गोल करून आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला. कपिल साठे याने रोवन परेराच्या पासवर गोल करण्याची एक संधीही गमावली. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून गोल न करता आल्याने पूर्वाध गोलशून्य बरोबरीत गेला. उत्तरार्धात प्रॅक्टिस संघाने खेळात बदल करीत आक्रमक व वेगवान चाली रचण्यास प्रारंभ केला. योगेश कदम याच्या पासवर इंद्रजित मोंडलची सोपी संधी वाया गेली. त्यानंतर ‘फुलेवाडी’कडून माणिक पाटील याने मारलेल्या बायसिकल किकचा फटका गोलपोस्टवरून बाहेर गेला. या किकला प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून दाद दिली. या संधीनंतर प्रॅक्टिस क्लबच्या योगेश कदम याने मोठ्या डी बाहेरून मारलेला फटका थेट गोल पोस्टवरून गेला. ‘प्रॅक्टिस’कडून अमोल पसारे, ‘फुलेवाडी’कडून निखिल खाडे यांनी उत्कृष्ट गोलरक्षण करीत आपल्या संघावर होणारे गोल वाचविले. अखेरपर्यंत दोन्ही संघांना गोल करता न आल्याने मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्येही ‘प्रॅक्टिस’कडून सचिन बारामते, इंद्रजित मोंडल, राहुल गायकवाड यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून रोहित मंडलिक, कपिल साठे, माणिक पाटील यांनी गोल नोंदवीत ३-३ असा पुन्हा सामना बरोबरीत आणला. त्यामुळे मुख्य पंचांनी सडनडेथचा अवलंब केला. यामध्येही ‘प्रॅक्टिस’कडून प्रतीक बदामे, ओंकार पाटील यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून निखिल जाधवने गोल केला. अखेरीस २-१ अशी स्थिती असताना ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक निखिल खाडे याने मारलेला फटका प्रॅक्टिस क्लबचा गोलरक्षक राहुल देसाई याने लिलया तटवीत आपल्या संघास विजय मिळवून दिला. या विजयामुळे प्रॅक्टिस क्लब स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला.