शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आजरा क्रीडासंकुलचे काम पीडब्ल्यूडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आजरा तालुका क्रीडासंकुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजरा तालुका क्रीडासंकुल समितीचे अध्यक्षपदही मंत्री पाटील यांनी स्वीकारले आहे.‘प्रत्येक तालुक्याला एक क्रीडासंकुल’ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आजरा तालुका क्रीडासंकुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजरा तालुका क्रीडासंकुल समितीचे अध्यक्षपदही मंत्री पाटील यांनी स्वीकारले आहे.‘प्रत्येक तालुक्याला एक क्रीडासंकुल’ या योजनेतून आजरा तालुका क्रीडासंकुलासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला; परंतु गेली अनेक वर्षे तेथील झाडे तोडणे, जमीन मोजून घेणे, विजेचे खांब काढणे हेच काम सुरू आहे. खात्यावर पैसे पडून आहेत; परंतु विविध खात्यांमध्ये समन्वय नसल्याने पाठपुराव्याअभावी हे काम ठप्पच होते.अशातच आजरा तालुका क्रीडासंकुल समितीला अध्यक्षच नसल्याने याबाबत बैठकाही होत नव्हत्या. आमदार प्रकाश आबिटकर हे भुदरगड, राधानगरी आणि आजरा या तालुक्यांचे आमदार आहेत. भुदरगड, राधानगरी तालुक्यांच्या क्रीडासंकुल समितीचे ते अध्यक्ष आहेत. तिसºया समितीचे अध्यक्षपद त्यांना नियमाने स्वीकारता येत नव्हते.परिणामी क्रीडासंकुलाचे काम पुढे सरकत नव्हते. शिवसेनेने हा प्रश्न उपस्थित करून आंदोलन केले होते. तसेच जिल्हा क्रीडाधिकाºयांना निवेदनही दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात क्रीडासंकुलबाबत सविस्तर बैठक झाली. क्रीडा विभागाकडील मनुष्यबळाचा विचार करता, त्यांच्याकडून हे काम गतीने होणार नसल्याने ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ८७ लाख रुपयांमधून संरक्षक भिंत आणि अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक पूर्ण होणार आहे. अन्य कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून तो द्यावा, असे निवेदन यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, चंदगड विधानसभा सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, संभाजी पाटील, राजू सावंत यांनी पालकमंत्र्यांना दिले. त्यानुसार या क्रीडासंकुलासाठी वाढीव निधी देणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी यावेळी सध्यस्थिती सांगितली.यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, एस. आर. पाटील, आजºयाच्या तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर, विजय कोंडूसकर, विजय डोंगरे, नेताजी कातकर उपस्थित होते.‘लोकमत’ चा पाठपुरावाआजरा तालुक्यातील रखडलेले क्रीडासंकुल पूर्ण करण्यासाठी चंद्रकांतदादांनीच आजºयाच्या समितीचे अध्यक्षपद स्वीकारून आदर्श क्रीडा संकुल उभारून दाखवावे, अशी आजरा तालुक्यातील क्रीडाप्रेमींची मागणी असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यांनी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारले असल्याचे आजच्या या बैठकीत स्पष्ट झाले.