शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजिव सप्ताहानिमित्त कोल्हापूरातून प्रभात फेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:03 IST

 वृक्ष संवर्धनाबरोबरच वन्य पशुपक्षाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशांनी वन्यजिव सप्ताहानिमित्त भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य पोस्ट ऑफिसपासून या प्रभात फेरीचा शुभारंभ उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याहस्ते करण्यात आला.

कोल्हापूर दि. 02 : वृक्ष संवर्धनाबरोबरच वन्य पशुपक्षाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशांनी वन्यजिव सप्ताहानिमित्त भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. मुख्य पोस्ट ऑफिसपासून या प्रभात फेरीचा शुभारंभ उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्याहस्ते करण्यात आला.

वन्यजीव विभाग, समाजिक वनीकरण, वन विभाग, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्यावतीने आयोजित केलेली ही प्रभात फेरी वन विभागाच्या कार्यालयापासून सुरुवात होऊन पुढे महावीर कॉलेज, सीपीआर चौक, महापालिका, शिवाजी चौकातून पुढे भवानी मंडप येथे समारोप करण्यात आला. 

या प्रसंगी उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्यासह विभागीय वन अधिकारी माणिकराव भोसले, सहायक वन संरक्षक, विजय गोसावी, विद्यापीठाचे सहप्राध्यापक अमोल कुलकर्णी, करवीरचे आरएफओ विश्वजीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवरतसेच विद्यार्थी उपस्थित होते. 

या प्रभात फेरीमध्ये पेड लगाओ - देश बचाओ, रक्षण करा रक्षण करा - वन्य प्राण्यांचे रक्षण करा यासह अनेक घोषवाक्यांनी परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. 

वने व वन्य जिवांचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी या प्रभात फेरीबरोबरच फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छ कोल्हापूर तसेच ट्रेकिंग असे उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले. 

सर्व स्पर्धातील विजेत्यांचे बक्षीस वितरण 7 ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार असल्याचेही डॉ. शुक्ल म्हणाले.