शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सत्तेसाठी जोरदार चुरस

By admin | Updated: March 28, 2016 00:13 IST

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : नेते व समर्थकांची मतदान केंद्रावर गर्दी

गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यासाठी ७९.८५ टक्के इतके मतदान शांततेत झाले. दिवसभर मतदान चुरशीने होताना दिसले. मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी दुचाकी, तीनचाकीसह चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. वयोवृद्धांसह महिलांनीही उत्साहात मतदान केले. निवडणुकीतील चुरस आणि मतदारांच्या उत्साहामुळे मतदानाची आकडेवारी वाढली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) संजय पवार तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हणुमंत पाटील, सहाय्यक निबंधक ए. एच. भंडारी व धनंजय पाटील यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)नेत्यांची रपेट..समर्थकांचा तळ..!आमदार मुश्रीफ व कुपेकर, अ‍ॅड. शिंदे आणि डॉ. शहापूरकर व चव्हाण यांनी तालुक्यातील बहुतेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली. राष्ट्रवादीचे युवराज पाटील, शहापूरकरांचे समर्थक शिवसेनेचे संजय घाटगे व विजय देवणे, भाजपचे बाबा देसाई व परशुराम तावरे ही मंडळी दिवसभर गडहिंग्लजमध्ये तळ ठोकून होती.संस्था गटात दोघांचाही दावासंस्था गटात शहापूरकर पॅनेलचे उमेदवार स्व. राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद हत्तरकी आणि शिंदे-मुश्रीफ-कुपेकर आघाडीचे उमेदवार मनोहर पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी गटा-गटाने येऊन मतदान केले. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी गडहिंग्लज शहरासह तालुकाभर फटाके वाजवून विजयाचा दावा केला. त्याची दिवसभर चर्चा झाली.