शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीविरोधी लढ्याचे रणशिंग

By admin | Updated: February 28, 2015 00:21 IST

वीज बिलांची होळी : लढ्यात एकसंधपणे सामील होण्याचे एन. डी. पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : वाढीव दराने आलेल्या वीज बिलांची महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या दारात होळी करीत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वीज दरवाढविरोधी लढ्याचे रणशिंग शुक्रवारी कोल्हापुरातून फुंकले. वीज बिलांची होळी हा सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न असून, आगामी काळात सरकारविरोधात तीव्र लढा उभा करणार असून, या लढ्यात एकसंधपणे ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. लढा देण्यास आळस केलात तर तो जीवघेणा ठरेल, असा इशाराही प्रा. पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला. राज्य सरकारसह वीज वितरण कंपनीवर कडाडून हल्ला चढवत प्रा. पाटील म्हणाले, आई जेवू घालेना व बाप भीक मागू देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. विजेचे दर वाढत असताना शेतीमालाला त्याप्रमाणात भाववाढ मिळत नाही. शेतकऱ्यांकडे दहा हजार कोटींची थकबाकी असल्याची थाप महावितरण मारत आहे, त्यामध्ये तथ्य नाही. शेतकऱ्यांच्या नावाने सरकारकडून अनुदान हडप करायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढून ओरडायचे हे खपवून घेतले जाणार नाही. इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून लढा दिल्यानेच शेतकऱ्यांचे २० हजार कोटी वाचले, पुढेही ही लढाई सुरूच ठेवावी लागेल, आळस करू नका; अन्यथा स्वत:च्या पायावर दगड पाडून घ्याल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रताप होगाडे म्हणाले, सोलर पंप शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्याऐवजी सरकारनेच १ मेगावॅटचे प्रकल्प तयार करून सोलर पंप नको, सोलर वीज शेतकऱ्यांना द्यावी. यावेळी बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, आर. जी. तांबे, मारुतराव जाधव, आदी उपस्थित होते.