शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: January 1, 2016 00:04 IST

महावितरणची कारवाई : बुबनाळसह सात गावांचे वीज बिल थकले

बुबनाळ : शिरोळ तालुक्यातील बुबनाळसह औरवाड, आलास, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ व गणेशवाडी या नदीपलीकडील सात गावांतील पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेंचे वीज बिल थकबाकीपोटी महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांत ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.शिरोळ तालुक्यात ५३ गावे असून, प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहेत. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात सर्वच योजनांची वीज बिले थकीत आहेत. असे असताना विद्युत वितरण कंपनीने सात गावांतीलच नळपाणी पुरवठा योजनेंवर वीज बिल थकबाकीपोटी कारवाईचा बडगा उगारला आहे. वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुल्ले यांनी संबंधित विभागाला ग्रामपंचायतीची घरपट्टी वसुली बंद असल्यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आहेत, त्यामुळे पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेच्या वीज बिल थकबाकीपोटी वीज कनेक्शन तोडू नये, असे लेखी पत्र देऊनही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. नदीपलीकडील आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ व गणेशवाडी या गावांत नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. योजनांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे सात गावांत पाणीटंचाई निर्माण होणार असून, नदी उशाला असूनही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार असेच चित्र आहे. (वार्ताहर)शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांतील पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपयांची वीज बिले थकीत आहेत. याबाबत कंपनीकडून वेळोवेळी सूचना देऊनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. १० जानेवारीपर्यंत वीज बिल भरण्याबाबत लेखी पत्र ग्रामपंचायतीने कंपनीला देऊन वीजपुरवठा सुरळीत करून घेण्याबाबत ग्रामपंचायतींना कळविले आहे.- एस. डी. अकिवाटे, उपकार्यकारी अभियंता, शिरोळग्रामपंचायतींच्या थकीत असलेल्या घरफाळ्यांची वसुली तूर्तच सुरू झाली आहे. मात्र, ग्रामस्थांकडून वसुली होत नसल्यामुळे ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतींना वीज बिल भरण्यासाठी आणखी थोडे दिवस मुदत देऊन महावितरण कंपनीने सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत करावा.- सुनंदा दानोळे, जि. प. सदस्य, आलास