शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची खुर्ची काढून घेण्याची जनतेत ताकद

By admin | Updated: August 31, 2014 00:29 IST

महादेवराव महाडिकांचा टोला : ‘महागणपती’ दर्शनासाठी खुला

कोल्हापूर : सत्तेची मस्ती दाखविल्यास जनता खुर्ची काढून घेते, असा टोला आज, शनिवारी रात्री येथे आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावला. येथील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या ‘महागणपती’चे उद्घाटन महाडिक यांच्या हस्ते झाले व महागणपती भाविकांच्या दर्शनासाठी खुला झाला. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. परंतु महाडिक यांनी भाषण आटोपते घेतल्याने फारशी राजकीय टोलेबाजी झाली नाही.खासदार धनंजय महाडिक यावेळी प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे उपस्थित होते. यांच्यामध्ये चांगलाच राजकीय कलगी-तुरा रंगला, पण ‘आप्पां’ची फटकेबाजी ऐकण्यासाठी आलेल्यांची निराशा झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहाही ठिकाणी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार विजयी करण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी ‘महागणपती’च्या साक्षीने केल्याने उपस्थित अस्वस्थ झाले. आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, जनतेने दिलेली सत्ता ही जनतेच्या विकासासाठी वापरायची असते. त्या सत्तेची कोणाला मस्ती चढल्यास हीच जनता ही सत्तेची खुर्ची काढून घेतल्याशिवाय राहात नाही. जिल्ह्णाचे राजकारण महाडिक यांना वगळून कोणाला करता येणार नाही. पत्त्यांच्या डावातील ५२ पानांतील हुकमी एक्के माझ्याकडे आहेत. माझा आज राजकीय बोलण्याचा मूड नाही. पुढील वर्षी सगळा हिशेब चुकता करू.महेश जाधव यांनी ‘दक्षिण’मधून आमदार करण्याचे साकडे महागणपतीकडे घालत एका तरुणाला संसदेत पाठविले, आता दुसऱ्या तरुणाला विधानसभेत पाठवून पुढच्या वर्षी आमदार म्हणून पूजा करण्याची संधी दे, अशी प्रार्थना केली. आठ दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर उत्तरमधून आपली उमेदवारी जाहीर केल्याचे सांगून आर. के. पोवार म्हणाले, उद्या राजेश क्षीरसागर आणि आपल्यातच लढत असून १९९९ ला सुरेश साळोखे आणि आपण खेळीमेळीत लढाई केली, तशी यावेळी करुया असे सांगत आमदार क्षीरसागर यांनी आंदोलने केली, मी कामे केल्याने एकदा आमदार करावे, असे साकडे महागणपतीला पोवार यांनी घातले. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, महागणपतीला साकडे घालून अडचणीत आणणार नाही, उद्या राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, माणसाची इच्छाशक्ती समुद्राप्रमाणे असावी. या महागणपतीकडे नवस केले तर मिळते. कारण, मला राजकारणात आल्यानंतर १५ वर्षांनंतर महापौरपद मिळाले, असे महेश जाधव यांच्याकडे बघत सांगितले. यावेळी महापौर तृप्ती माळवी, नगरसेविका माधुरी नकाते, नगरसेवक भूपाल शेटे, रमेश तनवाणी, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री होण्यासाठी आमची गरज !महेश जाधव यांनी ‘दक्षिण’वर दावा सांगितल्याने अस्वस्थ झालेले भगवान काटे म्हणाले, महायुतीचा मुख्यमंत्री करताना आम्ही बांधकामामध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘कपरी’ची भूमिका असणार आहे. ‘दक्षिण’मध्ये धनदांडगा अंगावर बसण्यापेक्षा चळवळीतील कार्यकर्त्याला संधी द्या, उपरा उमेदवार न लादण्याचे शहाणपण महागणपती तुम्हाला देवो. क्षीरसागर मूर्तीचे देणगीदार...शिवाजी चौक तरुण मंडळाने यावर्षी महागणपतीची वर्गणी घेतलेली नाही. पुढील २० वर्षे या मंडळाच्या महागणपतीचे बुकिंग आहे. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी अ‍ॅडव्हान्स म्हणून एक लाख रुपये मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्याकडे दिले.नरकेंची सावध भूमिका!या व्यासपीठावरून बोलले की त्याचे पडसाद जिल्ह्णात उमटतात. त्यामुळे आज राजकीय भाष्य करणार नसल्याचे सांगत आमदार चंद्रदीप नरके यांनी सावध भूमिका घेतली. चमत्कार जनतेचा...गेले दहा वर्षे खासदार धनंजय महाडिक हे जनतेची सेवा करीत आहेत. मात्र, त्यांना यश आले नव्हते. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे उभे राहिले. या निवडणुकीत ते निवडून आले. ही निवडणूक सोपी नव्हती. हा धनंजय महाडिक यांचा नव्हे, तर जनतेचा चमत्कार आहे, असे आमदार महाडिक यांनी सांगतिले.