शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आबिटकर, सत्यजित कदम यांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: September 28, 2014 00:56 IST

विधानसभा निवडणूक; भाजपच्या महेश जाधव यांचीही मोटारसायकल रॅली : ‘उत्तर’मधून शेकापही लढणार

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांनी, तर राधानगरी- भुदरगड मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी आज, शनिवारी जोरदारपणे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संभाजी देवणे यांनी अर्ज भरला. भाजपतर्फे महेश जाधव यांनीही मोटारसायकल रॅलीद्वारे जाऊन अर्ज भरला. सत्यजित कदम यांची रॅली स्टेशनरोडवरील कॉँग्रेस कार्यालयाजवळ आली असता माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे स्वागत केले. येथे झालेल्या छोट्या सभेत मालोजीराजे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. रवींद्र मोरे यांनी स्वागत केले. विक्रम जरग यांनी आभार मानले. रॅलीत पाचशेहून अधिक मोटारसायकली व पन्नासहून अधिक चारचाकी होत्या. नगरसेवक दिगंबर फराकटे, राजाराम गायकवाड, संजय मोहिते, श्रीकांत बनछोडे, सरस्वती पोवार असे मोजके पाचच नगरसेवक होते. विशेष म्हणजे शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनीही अर्ज भरण्यास येण्याचे टाळले. सतेज पाटील यांना मानणारे सर्वच नगरसेवक गैरहजर होते.महेश जाधव यांची रॅली भाजपचे उमेदवार महेश जाधव यांनी बिंदू चौक येथील पक्षाच्या कार्यालयापासून मोटारसायकल रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या रॅलीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले.‘शेकाप’ही लढणार कोल्हापूर उत्तरमधून शेतकरी कामगार पक्षातर्फे आज अचानक मनीष प्रतापसिंह महागावकर यांनी अर्ज भरला. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यावेळी उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज भरला. ‘मनसे’तर्फे सुरेश साळोखे यांनीही उमेदवारी अर्ज भरून कालच्या अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली. प्रकाश आबिटकरांचा अर्जराधानगरी : राधानगरी-भुदरगड मतदारसंघासाठी आज, शनिवारी १६ उमेदवारांनी २५ अर्ज दाखल केले. शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केलेल्यांत आमदार के. पी. पाटील व रणजितसिंह पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस), बजरंग देसाई, हिंदुराव चौगले, विजयमाला देसाई (राष्ट्रीय कॉँग्रेस), आण्णासाहेब नवणे (स्वाभिमानी शेतकरी संघटना), अरुण डोंगळे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, अशोक चराटी (सर्व अपक्ष), डॉ. राजीव चव्हाण (बहुजन मुक्ती पार्टी), उमेश कांबळे (ब्लॅँक पॅँथर), शहाजी कांबळे (रिपब्लिकन पार्टी), युवराज पाटील (मनसे) यांचा समावेश आहे.