शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पावडर राज्य व केंद्र सरकारने खरेदी करावी -शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होत असून, बटर व पावडरमुळे दूध संघ अडचणीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होत असून, बटर व पावडरमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने बटर व पावडर खरेदी करून विक्री करावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ‘गोकुळ’च्या शिष्टमंडळाला दिली.

‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील व संचालकांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांनी आपण मुख्यमंत्री असताना ‘गोकुळ’ला ताराबाई पार्क येथील दिलेली शासकीय जागा, मुंबईतील दूध विक्रीस परवानगी आदी आठवणींना उजाळा दिला. ‘गोकुळ’ने कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या विविध योजना, त्यातून पारंपरिक दूध व्यवसायात निर्माण झालेली व्यावसायिकता याबद्दल कौतुक केले. कोल्हापूर जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे ‘गोकुळ’ने केल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. दूध उत्पादकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत असताना ‘गोकुळ’चे नाव देश पातळीवर पोहोचवण्याची जबाबदारीही आपल्यावर, या जाणिवेतून काम करा, असा सल्ला देत राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर काही मदत लागल्यास सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, मुंबई शाखा प्रमुख दयानंद पाटील उपस्थित हाेते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण, दुग्धविकास मंत्री सुनील केदार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार व कृषी राज्‍यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांचीही सदिच्छा भेट घेतली.

फोटो ओळी : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालकांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बाबासाहेब चौगले, अरुण डोंगळे, डी. व्ही. घाणेकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, दयानंद पाटील उपस्थित होते. (फोटो-०९०६२०२१-कोल-गोकुळ)