शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पोतदार दाम्पत्य पोलिसांत हजर

By admin | Updated: May 8, 2014 12:13 IST

कमळकर मारहाण प्रकरण : एक दिवसांची पोलीस कोठडी

 कोल्हापूर : शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी फरारी असलेल्या शाहूवाडीच्या माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान सदस्या प्रभावती पोतदार (वय ३५) व त्यांचे पती प्रकाश नामदेव पोतदार (४५, रा. नम्रता हौसिंग सोसायटी, सुर्वेनगर) हे दोघेही आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. १५ दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांना जिल्हा परिषदेच्या प्रतीक्षाकक्षातून बाहेर येताना संशयित प्रभावती पोतदार व प्रकाश पोतदार यांनी मारहाण केली होती. त्यानंतर कमळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. पोतदार दाम्पत्याने आपल्यास अटक होऊ नये म्हणून टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता तेथेही त्यांचा अर्ज फेटाळला. गेली पंधरा दिवस अटकेच्या भीतीने हे दाम्पत्य लपून राहत होते. त्यांनी घटना घडल्यापासून सुर्वेनगर व शाहूवाडी तालुक्यातील डिघे शिराळे येथील घर सोडले होते. काल शाहूपुरी पोलिसांनी त्यांच्या मुलाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही न्यायालयांनी जामीन अर्ज फेटाळल्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणार होती. त्यामुळे हे दाम्पत्य सकाळी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक छाया देवरे करत आहेत. तोंड लपविण्याचा प्रयत्न पोतदार दाम्पत्यास अटक झाल्याचे वृत्त शहरात पसरताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी दाम्पत्य आपला चेहरा लपवून घेत होते तर सदस्या प्रभावती पोतदार यांना आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. या दोघांना इतर आरोपींप्रमाणेच पोलिसांनी वागणूक दिली. पोतदार दाम्पत्यास एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांची करवीर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र कोठडी आहे. त्यामध्ये प्रभावती पोतदार एकट्याच रात्रभर तिष्टत बसल्या होत्या. तेथूनच काही अंतरावरील कोठडीमध्ये प्रकाश पोतदार याला ठेवण्यात आले होते. एरव्ही रूबाब मारणार्‍या या दाम्पत्याने रात्रभर बिन भाड्याच्या खोलीत मुक्काम केला. त्यावेळी त्यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी विचारपूस करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी या दोघांनाही अश्रू अनावर झाले. (प्रतिनिधी)