शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

उचा‘पती’मुळे तीन महिन्यांनी नियुक्तीपत्र

By admin | Updated: December 1, 2015 00:13 IST

जिल्हा परिषदेचा कारभार : निम्मे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मिळाले अकरा शिक्षक; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या एका मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उचा‘पती’मुळे सहशिक्षक नियुक्तीची पत्रे मिळण्यास तीन महिने विलंब लागल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. परिषदेच्या उच्च माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये आपल्या नातेवाइकांची वर्णी लागावी म्हणून नियुक्तीच्या प्रक्रियेलाच त्यांनी दबाव टाकून ब्रेक लावला होता. मात्र, प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे अखेर २० नोव्हेंबर रोजी ११ शिक्षकांना नियुक्तीची पत्रे दिली आहेत. एका शिक्षकाची नियुक्ती राखीव ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे एम. आर. हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज (गडहिंग्जज), परशुराम विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज (गगनबावडा) अशा दोन शाळा चालविल्या जातात. या दोन्ही शाळांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची दरवर्षी झुंबड उडत असते. या दोन्ही शाळांत विनाअनुदानित तुकडीसाठी १२ सहशिक्षकपदे रिक्त होती. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने २२ जून २०१५ अखेर उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले. तब्बल ४५ उमेदवारांचे अर्ज आले. बहुतांशी उमेदवारांनी आपलीच वर्णी लागावी म्हणून जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी यांची भेट घेऊन मोर्चेबांधणी केली. दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या वशिल्यावर मर्यादा आल्या. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयात १० सप्टेंबरला मुलाखत घेतली. विविध निकषांद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडे प्रस्ताव गेला. शिक्षण विभागात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते पती महाशयांनी आपले वजन वापरण्यास सुरुवात केली. गगनबावडा येथील शाळेत आपले नातेवाईक उमेदवाराची वर्णी लागावी, यासाठी धडपड करू लागले. नातेवाईक उमेदवाराचे नाव प्रतीक्षायादीत असल्याने निवडीच्या यादीतील एका उमेदवारास बाद ठरविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली.या संपूर्ण घोळामुळे अन्य निवड झालेल्या ११ उमदेवारांना नियुक्तीपत्र देण्यासही विलंब झाला. दरम्यान, उचा‘पती’चा प्रताप चव्हाट्यावर आला. त्यानंतर त्यांनी काही प्रमाणात अंग काढून घेतले. त्यामुळे शेवटी प्राथमिकच्या प्रशासनाने २० नोव्हेंबरला नियुक्तीपत्र दिले आहे. (प्रतिनिधी)टेबल बदलाची कारवाई...प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रियेचे काम चालणाऱ्या टेबलवरील लिपिकाने कागदपत्रांची छाननी काटेकोरपणे केली नसल्याचे पुढे आले. निवडीच्या यादीतील एका उमेदवाराच्या शैक्षणिक प्रमाणपत्रात १९८२ आणि १९८३ अशा दोन जन्मतारखा आहेत. याच मुद्द्यावरून निवड यादीतील उमेदवारास बाद ठरवून आपल्या नातेवाइकास नोकरी लावण्याचा प्रयत्न ते पतीराज करीत आहेत; परंतु निवड यादीतील उमेदवारानेही बंड करून उचा‘पती’च्या विरोधात आवाज काढण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कागदपत्रांची छाननी करण्यात कुचराई केलेल्या लिपिकावर टेबलबदलाची कारवाई झाली आहे. जिल्हाधिकारी निर्णय घेणार..जन्मतारखेत खाडाखोड केली, खऱ्या जन्मतारखेचा पुरावा दिला नाही, यासंबंधी प्रश्न निर्माण झाल्यामुळे संबंधित शिक्षकाच्या नियुक्तीपत्रासंबंधी जिल्हाधिकारी बैठक घेणार आहेत. बैठकीत कागदपत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर जन्मतारखेसंबंधी घोळ निर्माण झालेल्या उमेदवारास नियुक्तीपत्र द्यायचे की पदाधिकाऱ्याच्या पतीच्या नातेवाइकास द्यायचे हा निर्णय होणार आहे. नियुक्तीपत्र दिलेल्या उमेदवारांची नावे अशीदेवयानी परगावकर, स्वाती चौगुले, अतुल बुरटुकणे, दीपक पाटील (परशुराम, गगनबावडा), जयश्री रेडेकर, विद्याराणी नाईक, भारती कदम, पूनम तळगुळकर, सुप्रिया कोठीवाले, वैशाली साबळे, विनी फर्नांडिस.