शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या राजीनाम्याची शक्यता

By admin | Updated: June 4, 2017 01:28 IST

राष्ट्रवादीत हालचाली : मुश्रीफ दोन दिवसांत घेणार बैठक; ठरविलेला कालावधी ८ जूनला संपणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापौर हसिना फरास यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत महानगरपालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. फरास यांना सहा महिन्यांचा कार्यकाल ठरवून दिला होता. त्याची मुदत आता ८ जूनला संपत आल्याने या चर्चेला राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ येत्या दोन दिवसांत बैठक घेण्याची शक्यता आहे. फरास यांची १२ डिसेंबर २०१६ ला महापौरपदी निवड झाली होती. फरास यांच्यासह त्यावेळी अनुराधा खेडकर, माधवी गवंडी यादेखील इच्छुक होत्या. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आमदार मुश्रीफ यांनी सहा-सहा महिने संधी देण्याचा निर्णय घेतला होता.हसिना फरास यांना महापौरपदाची प्रथम संधी देताना आमदार मुश्रीफ सांगतील तेव्हा राजीनामा देण्याचे त्यांचे पुत्र आदिल फरास यांच्याकडून मान्य करवून घेण्यात आले. त्यासाठी प्रा. जयंत पाटील यांनी आमदार मुश्रीफ यांचे मोबाईलवर संभाषण घडवून दिले. विशेष म्हणजे मुश्रीफ यांचे हे बोलणे स्पीकर आॅन करून सर्वांना ऐकविण्यात आले होते. ज्यावेळी मी सांगेन त्यावेळी राजीनामा द्यावा लागेल, हे मुश्रीफ यांनी सर्र्वांच्या साक्षीने आधी फरास यांच्याकडून वदवून घेतले आणि मगच त्यांचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. फरास यांचा महापौरपदाचा सहा महिन्यांचा कार्यकाल ८ जूनला संपणार आहे. त्यामुळे त्या राजीनामा केव्हा देणार याकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. महापालिका वर्तुळातही तशी चर्चा सुरू झाली आहे. राजीनाम्यानंतर आणखी हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. महापौरांचा राजीनामा घेण्यासंदर्भात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत आमदार मुश्रीफ यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजू लाटकर, नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांना बोलाविले होते. तथापि, माजी आमदार बाबूराव धारवाडे यांच्या अंत्ययात्रेमुळे पोवार, लाटकर बैठकीला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ही बैठक झाली नाही. येत्या दोन दिवसांत पुन्हा ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.एक वर्षाचाच कार्यकालमहापौरपदी निवड झाल्यानंतर जेव्हा मी आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून त्यांचे आभार मानले, त्यावेळी मुश्रीफ यांनी वर्षभर चांगले काम करा, अशा शब्दांत मला शुभेच्छा दिल्या होत्या. याचा अर्थ मला एक वर्षासाठी संधी दिली आहे, असा होतो, असे महापौर हसिना फरास म्हणाल्या.इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सहा-सहा महिने संधी देण्याचा निर्णय घेतला होता.महापौर राजीनामा केव्हा देणार याकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे लक्ष. त्यानंतर इच्छुकांच्या हालचाली गतिमान होणार.