शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीला कवडीचा भाव

By admin | Updated: July 17, 2014 00:15 IST

भूमिपुत्रांना धोका : गगनबावड्याला जमीन एजंटांचा विळखा

चंद्रकात पाटील - गगनबावडागगनबावडा परिसरात भूमिपुत्रांच्या अज्ञानाचा फायदा घेत कराडो रुपयांचा जमीन व्यवहार करून देणाऱ्या एजंटांंचा सुळसुळाट सुरू आहे. भूमिपुत्रांच्या अज्ञानाचा फायदा घेत करोडो रुपयांच्या जमिनी कवडी मोलाने धनदांडग्यांच्या हवाली होत आहेत. प्राप्त माहितीनुसार या परिसरातील निम्म्यांहून अधिक भूमिपुत्रांनी एजटांना भुलून जमिनी विकल्या आहेत. काही वर्षांत उर्वरित जमिनीही त्यांच्याकडून बळकावल्या जाण्याची शक्यता आहे. परिणामी डोंगर माथ्यावरील भूमिपुत्रच येथे भूमिहीन होणार आहेत. कोल्हापूर शहरापासून ३५-४० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पर्यटन स्थळ परिसरात काही वर्षांपूर्वी केवळ हौस म्हणून काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जमिनी खरेदी केल्या. हा व्यवहार त्यावेळी हजोरांच्या घरात झाला. दळणवळणाच्या सुविधा आणि भविष्यात दगडधोंड्याच्या जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळणार या अपेक्षेने अनेकांच्या नजरा या जमिनीकडे वळल्या.पैसेवाल्यांनी थेट डोंगर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मोलमजुरी आणि जमिनीतील सुके गवत विकून जगणारा भूमिपुत्र मालामाल होऊ लागला. ठरावीक जणांच्या खिशात पैसा खेळू लागल्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारले. जमिनीच्या विक्रीचा हळूहळू धंदा झाला. शहरात जाऊन थोडेफार शहाणे आणि व्यवहार ज्ञान असणाऱ्या जाणकारांनी मोर्चा गावाकडे वळविला आणि एजंटांचा उदय झाला. गगनबावडा, असळज, बोरबेट, कोदे, अणदूर रस्त्यावर एखादी आलिशान गाडी उभी राहिली की, या एजटांनी त्यांना गाठलेच. दोघांतील चर्चेतून जागा पाहिजे म्हटल्यावर गरजू शेतमालकांच्या परस्पर जमिनी दाखवून सौदा ठरू लागला. हा सौदा मोठ्या किमतीला ठरवून मग ही मंडळी त्यांच्या गाडीतून मूळ शेतमालकांच्या घरी जातात. मोठे सायब हायती, तुमची जमीन त्यांना पसंद पडलिया तवा तुम्ही काय करणार? चांगला भाव मिळतोय देऊन टाका. तुमच्या अडी-अडचणीला ते मदत करतील, यासह त्यांच्या घरातील समस्या, कठीण प्रसंग सांगून त्याला हे दलाल दररोज भेटून बेजार करून सोडतात. अखेरीस शेतमालकाला पटवून सौदा पक्का केला जातो आणि जमिनीची विक्री होते. यामध्ये दलाल दोन्हींकडून दलाली पदरात पाडून घेतात. दलालीत रग्गड पैसा मिळू लागल्यावर कोणाची जमीन द्यायची याचा शोध घेऊन त्याची परस्पर किंमत ठरवून बाहेर चढ्या दराने विकण्याचा फंदा दलालांनी शोधला आहे.