शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’मध्ये एजंट पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: January 31, 2015 00:02 IST

खळबळ : अनधिकृत प्रवेश करताना कारवाई

कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वारंवार प्रवेश करू पाहणाऱ्या दिलीप माने या व्यक्तीस बंदोबस्तावरील पोलिसांनी आज, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. या अचानक केलेल्या कारवाईमुळे ‘दलाल मुक्ती’च्या कारवाईच्या धसक्याने एजंटांमध्ये एकच खळबळ माजली. अधिक चौकशी करता माने यांच्याकडे ज्याचे काम आहे त्या व्यक्तीचे अ‍ॅथॉरिटी पत्र नव्हते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये ‘दलाल मुक्त’ करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत ज्याच्याजवळ एखाद्या संस्था, व्यक्ती यांचे काम करण्याचे अ‍ॅथॉरिटी पत्र आहे व एकाच कामासंदर्भात एकाच व्यक्तीला हे अ‍ॅथॉरिटी पत्र दाखवून काम करण्यासाठी कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे अ‍ॅथॉरिटी पत्र नाही व वारंवार कार्यालयात प्रवेश करत आहेत, अशा एजंटांना प्रवेशद्वारावर रोखण्यात येते.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात एखादी व्यक्ती वारंवार येत असेल व त्यांच्याकडे एखाद्या संस्था, व्यक्ती यांचे अ‍ॅथॉरिटी पत्र नसेल, तर त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे आदेश कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्यावर ‘सरकारी कामात अडथळा आणला’ म्हणून गुन्हा नोंदविण्यात येईल. - लक्ष्मण दराडेप्रादेशिक परिवहन अधिकारी,