शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आजऱ्याची पॉझिटिव्हिटी, चंदगडचा मृत्युदर अधिक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

राम मगदूम । गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागातील आजरा तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक १२.६२ टक्के, तर चंदगड तालुक्याचा ...

राम मगदूम ।

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागातील आजरा तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक १२.६२ टक्के, तर चंदगड तालुक्याचा मृत्युदर सर्वाधिक ३.१० टक्के आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरातही 'चंदगड'च आघाडीवर असून, त्याचा दर ९०.५१ टक्के इतका आहे. परंतु, चंदगडच्या पॉझिटिव्हिटीचा दर सर्वांत कमी ७.८१ असतानाही मृत्युदर मात्र सर्वाधिक ३.१० टक्के इतका आहे, ही चिंतेची बाब ठरली आहे.

गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यांत मिळून एकूण १,०५,०८५ नागरिकांची कोविड तपासणी झाली. त्यात आढळलेल्या १०४९० पैकी ८९९८ रुग्ण पूर्ण बरे झाले.

दुर्दैवाने २८४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १०२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दि. १ एप्रिल ते १६ जुलै २०२१ अखेर गडहिंग्लज तालुक्यातील ४९२२३ जणांच्या तपासणीत ४७१४ रुग्ण आढळले. त्यांपैकी ३९१७ बरे झाले, तर १३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ५४५ रुग्ण उपचार घेत आहेत.

चंदगड तालुक्यातील २६४६८ जणांपैकी २०६६ रुग्ण आढळले. त्यांपैकी १८७० बरे झाले आहेत. ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या १६९ रुग्ण उपचार घेत आहेत.

आजरा तालुक्यातील २९३९४ जणांच्या तपासणीत ३७१० रुग्ण आढळले. त्यांपैकी ३२११ बरे झाले; तर ८३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ३१३ रुग्ण उपचार घेत आहेत.

गडहिंग्लज शहरातील १०४१० जणांच्या तपासणीत ११४१ रुग्ण आढळले. त्यांपैकी १०१८ बरे झाले; तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९८ रुग्ण उपचार घेत आहेत.

चंदगड शहरातील २९९८ जणांच्या तपासणीत ३११ रुग्ण आढळले. त्यांपैकी २६९ बरे झाले, तर नऊजणांचा मृत्यू झाला असून सध्या १६ रुग्ण उपचार घेत आहेत.

आजरा शहरातील ३८९५ जणांच्या तपासणीत ५३८ रुग्ण आढळले. त्यांपैकी ४५३ बरे झाले, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.

---------------

प्रथम संपर्कातील ३४४९९ जणांच्या स्राव तपासणीत ५८४७ जण बाधित आढळून आले. एकूण ९९२४ बाधितांच्या प्रथम संपर्कात ४०१२५ तर १,३०,२४६ नागरिक द्वितीय संपर्कात आल्याचे संपर्क तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

१६ जुलैअखेर तालुकानिहाय लसीकरण स्थिती : पात्रसंख्या, लस घेतलेले नागरिक व शिल्लक नागरिक.

गडहिंग्लज - ७६३१८ (७५३४१/९७७)

चंदगड - ५५८१६ (५२०२१/३७९५)

आजरा - ४३१०५ (३८२१८/४८८७)

---------------------