शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-बेळगाव मार्गाबाबत सकारात्मक

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

सदानंद गौडा : दोन वर्षांचा कालावधी लागणार

संकेश्वर : कऱ्हाड-बेळगाव (संकेश्वर-निपाणी मार्गे) रेल्वेमार्गाबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. मात्र, या योजनेस थोडा कालावधी लागेल, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले. चिकोडी दौऱ्यावर ते आले असता विलास घोरपडे यांनी त्यांची चिकोडीत भेट घेऊन रेल्वे मार्गाचे निवेदन सादर केले. त्यावेळी मंत्री सदानंद गौडा बोलत होते.निवेदनात म्हटले आहे की, १९०३ पासून भागातील जनता रेल्वेची मागणी करीत आहे. ब्रिटिश आमदानीत मद्रास मराठा सदर्न रेल्वे खात्याने संकेश्वरमध्ये आऊट एजन्सी सुरू केली होती. २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी मिळाल्यानेच मध्यंतरी पाच्छापुर-संकेश्वर-कोल्हापूर (८५. कि. मी.) आणि बेळगाव-संकेश्वर-निपाणी-कऱ्हाड (१९१ कि. मी.) अशा दोन मार्गांचा सर्व्हे झाला आहे.देशातील इतर राज्यांच्या मानाने कर्नाटकात कमी अंतरांचे रेल्वेमार्ग आहेत. नवीन मार्गास ५० टक्के केंद्र, तर ५० टक्के राज्य सरकारचा आर्थिक सहभाग असल्याने राज्याच्या वाट्याला येणाऱ्या निधींच्या तरतुदींबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना लिहिलेले पत्र आणि त्यांच्या सचिवाकडून आलेले पत्र घोरपडे यांनी रेल्वेमंत्री गौडांना दाखवून मध्ये रेल्वे पुणेतर्फे कऱ्हाड-बेळगाव सर्व्हेचा तपशील मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिला.यावेळी निवेदन स्वीकारून मंत्री सदानंद गौडा म्हणाले, केवळ आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा मागणीनुसार शक्य होईल, ती कामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापि, कऱ्हाड-बेळगाव मार्गाविषयी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यानंतर या मार्गासंबंधी निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)