शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड-वाघापूरला जोडणारा पूल सापडला वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

प्र्रशासनाच्या विरोधात संताप : रस्त्यामध्ये शेती जात असल्याने विरोध; योग्य मोबदल्याशिवाय काम करू न देण्याचा इशारा

अनिल पाटील - मुरगूड -कागल - भुदरगड तालुक्याला जोडणाऱ्या मुरगूड-वाघापूर दरम्यान वेदगंगा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण त्या पुलाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये मुरगूड आणि वाघापूर या दोन गावांतील शेतजमीन मोठ्या प्रमाणात जात असल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप असल्याने वाघापूर पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.संस्थानकालीन बाजारपेठ आणि प्रसिद्ध जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये भरत असल्याने भुदरगड तालुक्यातील गारगोटी, कडगाव आणि तळ कोकणातील लोकांचा मुरगूडशी संपर्क साधण्यासाठी मुदाळतिट्टा मार्गे यावे लागते. दरम्यान, वाघापूर आणि मुरगूड यांच्यामध्ये वेदगंगा नदीवर पूल बांधला, तर या सर्वांचे २० ते ३० कि. मी. जादाचे अंतर कमी होईल, शिवाय वेळही वाचेल. यासाठी लोकांनी पुलाची मागणी उचलून धरली. लोकप्रतिनिधींनीही या पुलासाठी प्रयत्न करून शासनाकडून निधी आणला.पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अगदी युद्धपातळीवर काम होत अल्पावधीतच ते काम पूर्णत्वाकडे आले आहे; पण प्रशासनाने त्या पुलाला जोडणारे मुरगूड व वाघापूरकडील रस्त्यांबाबत आपले धोरण गुलदस्त्यात ठेवले.पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने रस्त्याच्या कामासाठी लगबग सुरू झाली; पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांनी मात्र त्याला प्रखर विरोध केला आहे. आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने रस्ता दाखविला आहे, तसा न करता पुलाच्या अगदी दोन्ही बाजूला थोड्याच अंतरावर मोठाले ‘यू’टर्न वळण ठेवल्याने वाहतुकीसाठी धोका पोहोचणार आहे. आराखड्यामध्ये दाखवलेल्या रस्त्याबाबत बाधित शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाने कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, त्यांनी दोनवेळा पुलाचे काम बंद पाडले आहे. आता पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे अधिकारी, कागल व भुदरगडचे आमदार यांच्या समवेत शेतकऱ्यांशी चर्चा होणार असून, आपल्याला न्याय मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हे काम करू द्यायचे नाही, अशा पवित्र्यात शेतकरी आहेत.दत्तमंदिराला धोकावेदगंगा नदीकाठावर मुरगूडचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तमंदिराला अगदी लागूनच या रस्त्याच्या भरावाचे काम सुरू आहे. जमिनीपासून ४० फूट भराव वरती जाणार असल्याने मंदिराला धोका पोहोचणार आहे. त्यामुळे रस्ता मंदिरापासून दूर घ्यावा, अशी मागणी तरुण व ग्रामस्थांनी केली आहे.