शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मुस्लिम बांधवांकडून रावणेश्वराची पूजा

By admin | Updated: August 31, 2015 23:34 IST

श्रावणातला तिसरा सोमवार : शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती

कोल्हापूर : प्रत्येक धर्म, त्यांच्या चालीरिती वेगळ््या असल्या तरी माणसांच्या ठायी असलेली श्रद्धा आणि भक्ती त्या एकाच ईश्वरीय शक्तीला समर्पित असते. या भक्तीचे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी मुस्लिम बांधवांनी रावणेश्वराला रूद्राभिषेक केला. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शंकराच्या आराधनेच्या या महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व असते. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमला लागून असलेल्या रावणेश्वर मंदिराला मोठा धार्मिक इतिहास आहे. सोमवारी मुस्लिमबांधव रमजान हकिम, सलमा नायकवडी, चाँदसाो हकिम, जहाँगीर पटेल यांनी रावणेश्वराला रूद्राभिषेक केला व बेल वाहिला. त्यानंतर देवाची आरती करण्यात आली. गुरुजी अशोक भोरे यांनी पौरोहित्य केले. दुपारी ओंकार स्वाध्याय मंडळाच्यावतीने रूद्र पठण व स्तोत्र गायन झाले. त्यानंतर सुलभा देशपांडे यांचे गायन, चंचल देशपांडे यांचा भक्तिगीतांचा व रात्री राजू मिस्त्री यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या पिंडीस भाताचे लिंपण करण्यात आले. मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला. दुपारी सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसादाचे वाटप झाले. संध्याकाळी निरूपमा महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.अंबाबाईची शंकर आराधना तिसऱ्या सोमवारनिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची महादेवाच्या पिंडीचे पूजन करत असलेल्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. श्रावणानिमित्त अंबाबाई मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेले मातृलिंग मंदिरही दिवसभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.