शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची कौमारी रूपात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:47 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (रविवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची कौमारी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. सुटीचा दिवस ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (रविवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची कौमारी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने परस्थ भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होती. मंदिराबाहेर पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत अडीच लाख भाविकांचा आकडा पार झाला होता. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ कायम राहिल्याने कोल्हापूर हाऊसफुल्ल झाले होते.अश्विन शुद्ध पंचमीयुक्त षष्ठीच्या दिवशी श्री अंबाबाईची कौमारी रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवी नवकुमाराचे म्हणजेच स्कंदाचे स्त्रीरूप आहे. ही देवता सप्तमातृकांपैकी एक असून, तिचा मत्स्यपुराण, महाभारत, देवीमाहात्म्यामध्ये उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यांतील कौमारी ही एक मातृका.देवीमाहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या, त्यांत कौमारीचा उल्लेख येतो. कुमार स्कंदाची शक्ती म्हणून हातामध्ये तिने भाला घेतलेला आहे. मोरपिसांनी सुशोभित, कोंबडा, मोर आणि नागांनी परिवेष्टित असे तिचे स्वरूप आहे. अरण्यात एकांतसेवन करणारी अशी ती देवसेनास्वरूप कौमारी आहे.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासूनच मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती. रविवारी तर या गर्दीने पाच दिवसांचा उच्चांक गाठला. पहाटे चार वाजल्यापासून मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एरवी सुटीचा दिवस म्हटले की शहरात शुकशुकाट असतो. रविवारी मात्र नेमके उलटे चित्र होते. कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी, बिंदू चौक, न्यू महाद्वार रोड ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, खासबाग हे शहरातील मध्यवर्ती रस्ते केवळ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.