शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण झाले, मासे मेले पण कारवाई शुन्यच!

By admin | Updated: December 25, 2014 00:48 IST

‘भोगावती’नदीची स्थिती : प्रदूषण नियंत्रण मंडळ हतबल

कोल्हापूर : भोगावती नदी दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित पाणी मिसळले, हजारो मासे तडफडून मेले परंतू हे कुणामुळे झाले कुणालाच माहित नाही अशी सध्याची स्थिती आहे. नदी प्रदूषित होऊन चार दिवस उलटले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ दूषित पाण्याचा स्त्रोत शोधून काढू शकलेले नाही. प्रदूषण कशामुळे झाले हेच माहीत नसल्यामुळे कारवाई झालेली नाही. ‘प्रयोगशाळेतून अहवाल काय एका दिवसात येतो का?’ अशी विचारणा प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.‘आम्ही काय करावे, असे तुम्हाला वाटते?’ असा प्रतिप्रश्नच मंडळाचे अधिकारी करीत आहेत; त्यामुळे कारवाईसंबंधी साशंकता व्यक्त केली जात आहे. कोणाच्या तरी दबावाला बळी पडून कारवाई थांबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालय गांभीर्याने घेते आहे. दीर्घकालीन उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन केली. तरीही जलप्रदूषणासारख्या विषयाकडे किती गांभीर्याने मंडळ पाहते, हेही समोर येत आहे. भोगावती नदीमध्ये हळदी बंधाऱ्यास बरगे घालून पाणी अडविले. मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत शुक्रवारी (दि. १९) रोजी सायंकाळनंतर बंधाऱ्यापर्यंत मिसळले; त्यामुळे पाणी दूषित होऊन मासे मेले. याचे पडसाद उच्च न्यायालयात सोमवारी (दि. २२) उमटले. राजकीय दबावापोटी मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप झाला. इतके सारे झाल्यानंतरही प्रदूषण मंडळास नदी कशामुळे प्रदूषित झाली हेच कोडे अजून सुटलेले नाही. जिलेटनमुळे मासे मरु शकतात परंतू त्यामुळे पाणी इतके घाण होण्याची शक्यता नाही. शिवाय जिलेटन वापरले असेल तर ते कुणी वापरले याचाही शोध व्हायला हवा. प्रदूषण कुणी केले यावर त्यावर कारवाई करायची की नाही हे ठरले जावू नये अशी अपेक्षा नदी परिसरातील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. प्रदूषित पाणी, सुटलेली दुर्गंधी, मेलेले मासे हे सर्व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री घटनास्थळी जावून पाहिले आहे. तीन टँकरचा शोध सुरू आहे, अद्याप ते मिळालेले नाहीत. अहवाल प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. तो काय एका दिवसात मिळतो का? तुम्हाला आम्ही काय करणे अपेक्षित आहे? कारवाई झाल्यानंतर सांगतो. कारवाईसंबंधी भविष्य कसे सांगू? - एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ