शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

'या' ११ पैकी एक ओळखपत्र असेल तर करता येणार मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:32 IST

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन

ठळक मुद्देकेवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी ( २३ एप्रिल) जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे किंवा मतदाराकडे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या अकरा कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, केंद्र /राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे फोटो असलेले ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र आणि खासदार, आमदार व विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.

केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. नावनोंदणी अथवा पडताळणीसाठी https://eci.gov.in/voter/voter/ या वेबसाईटला भेट द्या. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील अकरा ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapur-pcकोल्हापूर