कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ९४.१० टक्के मतदान झाले. विकास सेवा संस्था गटात सहा तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले. निवडणुकीत चुरस नसली तरी मतदारांनी चुरशीने मतदान केले. १७ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात होते.कागल : ९९ टक्के मतदानकागल : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी येथील शाहू हायस्कूलमध्ये मंगळवारी कागल तालुक्यातील ८७६ मतदारांपैकी ८७० मतदारांनी मतदान केल्याने ९९ टक्के मतदान झाले. यामध्ये विकास सेवा संस्था गट, पतसंस्था गट, प्रक्रिया संस्था गटाचे १०० टक्के मतदान झाले, तर दूध संस्था, अन्य संस्थांच्या ५०२ मतांपैकी ४९६ इतके मतदान झाले.सेवा संस्था गटातील सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक, भैया माने आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. मंडलिक-मुश्रीफ गटाचे मतदार सकाळी लवकर आल्याने गर्दी झाली होती. शिवसेना-भाजपचे उमेदवार परशुराम तावरेही सकाळपासून हजर होते. आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, अनिल पाटील यांनीही नंतर येथे भेट दिली. सकाळी अकराच्या सुमारास संजय घाटगे, अमरीश घाटगे आपल्या ठरावधारक मतदारांसमवेत आले. सेवा संस्था गटातील त्यांचे उमेदवार दत्तोपंत वालावलकर आणि प्रमुख कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते, तर त्यानंतर शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे आपल्या मतदारांसमवेत या ठिकाणी आले. विकास सेवा संस्था गटातून १६१ पैकी १६१, प्रक्रिया गटात १०८ पैकी १०८, पतसंस्था गटातून १०५ पैकी १०५, तर दूध संस्था-इतर संस्था गटातून ५०२ पैकी ४९६ असे मतदान झाले.आजरा चुरशीने मतदानआजरा : आजरा तालुक्यातून जिल्हा मध्यवर्ती बँकेकरिता विकास संस्था गटासाठी १०० टक्के, तर कृषी पणन, पतसंस्था, बँका व इतर संस्था गटासाठी ९५ टक्के मतदान झाले आहे.विकास संस्था गटातून अशोकराव चराटी व जयवंतराव शिंपी यांच्यामध्ये जोरदार चुरस असल्याने दोन्ही उमेदवार मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. इतर मागास प्रवर्गातून निवडणुकीला सामोरे जाणारे प्रा. सुधीर मुंज हे देखील मतदान केंद्रावर होते. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अशोक चराटी यांचे समर्थक आले. त्यानंतर जयवंतराव शिंपी समर्थक ठरावधारकांचे मतदान झाले.मतदान केंद्रावर अशोक चराटी, केंद्र अधिकारी अमित गराडे व क्षेत्रीय मतदान अधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक उडाली. चराटी यांच्या मतदान केंद्रावरील वावरावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने हा प्रकार घडला. शिरोळमध्ये चुरशीने मतदानशिरोळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीकरिता शिरोळ तालुक्यात चुरशीने मतदान झाले. गट क्र. १ प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास सेवा संस्था, संयुक्त शेती संस्था, तसेच धान्य आदिकोष सहकारी संस्था गटातील १४८ मतदारांपैकी १४२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या गटातील उमेदवार बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर आणि शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.येथील पद्माराजे विद्यालयात मतदान चुरशीने व शांततेत पार पडले. विकास सेवा संस्था गटासाठी १४८ पैकी १४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निंबाळकर आणि यड्रावकर या प्रमुख दोन नेत्यांतच लढत आहे.शिरोळ मतदान केंद्रावर इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातील २८८ मतदारांपैकी २६० मतदारांनी मतदान केले. पतसंस्था, अर्बन बॅँक या गटातील ११६ पैकी ११६ मतदारांनी मतदान केले. शेतीमाल प्रक्रिया गटातील ५६ पैकी ५५ मतदारांनी आपला हक्क बजावला. शाहूवाडीत ९९ टक्के मतदानमलकापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शाहूवाडी तालुक्यात ९८.८७ टक्के मतदान झाले. शेतीपूरक, दूध संस्था गटात एकूण ९४ पैकी ८४ मतदारांनी, पतसंस्था गटात ४० पैकी ३८ मतदारांनी, प्रक्रिया गटातून ५ पैकी ५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्री शाहू हायस्कूल शाहूवाडी येथे मतदानास प्रारंभ झाला. दुपारी एक वाजता मानसिंगराव गायकवाड यांनी मतदारांना ट्रॅव्हल बसमधून आणले. सेवा संस्था गटातून एकूण ८९ मतदारांपैकी ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर उमेदवार मानसिंगराव गायकवाड, आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, थांबून होते, तर विरोधी उमेदवार सर्जेराव पाटील (पेरीडकर), नामदेव खोत, एच. आर. जाधव , बाबा लाड, रंगराव खोपडे, आदी उपस्थित होते. राधानगरी : ९६ टक्के मतदानराधानगरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी येथे ९६ टक्के मतदान झाले. चार गावांतील ७२१ पैकी ६६६ मतदारांनी मतदान केले. येथील कुमार विद्यामंदिर येथे दोन केंद्रांवर मतदान झाले. सेवा संस्था गटातील निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रथमच चुरशीशिवाय मतदान पार पडले.सेवा संस्था गटातील १९७ पैकी १२०, अर्बन बँक-पतसंस्था गटातील ५३ पैकी ५२, कृषी प्रक्रिया गटातील १५ पैकी १५, तर इतर संस्था गटातील ४५६ पैकी ४०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गगनबावडा : १०० टक्के मतदानगगनबावडा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मंगळवारी येथे सेवा संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. दरम्यान केंद्र क्रमांक १२ मध्ये पणन, दूध संस्था व इतर सर्वसाधारण गटात ९७ टक्के मतदान झाले. येथे ७४ पैकी ७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील सेवा संस्था गटातून जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पी. जी. शिंदे यांच्या विरोधात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक मानसिंग पाटील हे निवडणूक लढवित आहेत.माजी मंत्री सतेज पाटील यांनी सव्वा बारा वाजता मतदानासाठी आले. त्यावेळी पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, दोन्ही गटांकडून सेवा संस्था गटातून आपल्याला ३६ मते मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. तर झालेल्या ६६ मतांपैकी न्यायालयाच्या आदेशानुसार २३ मते ही स्वतंत्र पेटीत घेण्यात आली असून, न्यायालयाच्या निर्णयानंतरच या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गगनबावडा तालुक्याचा प्रतिनिधी न्यायालयाच्या निकालानंतरच ठरणार आहे. गारगोटी केंद्रावर १०० टक्के मतदानगारगोटी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गारगोटी येथील कन्याशाळेत चुरशीने मतदान झाले. दुपारपर्यंत सेवा संस्था आणि प्रक्रिया संस्था सभासदांचे १०० टक्के मतदान झाले. सत्तारूढ आघाडीतून संस्था गटातून माजी आमदार के. पी. पाटील हे निवडणूक लढवित आहेत. त्यांनी ठरावधारकांना पिवळे फेटे बांधून मतदान केंद्रावर मतदानासाठी आणले.के. पी. पाटील यांच्या विरोधात आमदार प्रकाश आबिटकर यांचे समर्थक माजी सभापती नंदकुमार ढेंगे यांनीही शक्तिप्रदर्शन करीत ठरावधारक आणले होते. दरम्यान, भाजप-शिवसेना प्रणित आघाडीचे कार्यकर्ते दिवसभर तंबू ठोकून होते. उमेदवार के. पी. पाटील व नंदकुमार ढेंगे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी संस्था गटातून १०० टक्के (२०६), प्रक्रिया संस्था १०० टक्के (३९), दूध संस्था १०० टक्के (५२) व इतर संस्था गटात २८३ असे सर्वच गटात चुरशीने १०० टक्के मतदान झाले.हातकणंगले : ९५ टक्के मतदानहातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा बँकेच्या ९०० ठरावधारकांपैकी ८५५ ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील रामराव इंगवले हायस्कूलमध्ये ९५ टक्के मतदान झाले.तालुक्यात जिल्हा बँकेच्या मतदानासाठी कमालीची चुरस होती. . विकास सेवा गटात १३८ पैकी १३३, प्रक्रिया गटात ६६ पैकी ६५, पतसंस्था गटात २४० पैकी २३२, तसेच दूध, प्रक्रिया, पाणीपुरवठा, ग्राहक, मजूर, औद्योगिक व इतर गटांतील ४५६ पैकी ४२५ ठरावधारकांनी मतदान केले.पन्हाळा : ९१ टक्के मतदानपन्हाळा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी पन्हाळा विद्यामंदिरात मंगळवारी तालुक्यातून चार गटांसाठी ९०.९६ टक्के इतके मतदान झाले. संस्था गटातून विनय कोरे बिनविरोध झाल्याने मतदान प्रक्रियेत चुरस जाणवली नाही. तालुक्यात संस्था राखीव गटात २४८ मतदारांपैकी २१२ मतदारांनी, कृषिपणन व शेती गटात ८९ पैकी ८६ , पतसंस्था गटात ९८ पैकी ९६ मतदारांनी, तर दूध संस्था व इतर संस्थांमध्ये ४२८ पैकी ३९१ मतदारांनी मतदान केले. (प्रतिनिधी)४प्रा. जयंत पाटील यांच्यासाठी नगरसेवक राजू लाटकर, विनायक फाळके, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, बाबा पार्टे आदी दिग्गजांनी राजारामपुरी येथील केंद्रावर दिवसभर तळ ठोकला होता. ४एकवेळचे गुरू-शिष्य असणारे के. पी. पाटील व नंदकुमार ढेंगे हे ‘केडीसीसी’च्या माध्यमातून एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. माजी आमदार के. पी. यांचा संस्था गटात वरचष्मा असतानाही ही निवडणूक त्यांना बिनविरोध करता आली नाही.४कागल तालुक्यात दोन्ही पॅनेलचे मिळून पाच उमेदवार आहेत. यापैकी भाजपचे परशुराम तावरे यांनी संजय घाटगे गट वगळता सर्वांशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर संजय घाटगे गटाचे उमेदवार दत्तोपंत वालावलकरही ठरावधारकांच्या संपर्कात होते. यामुळे क्रॉस व्होटिंगची चर्चा जोरात सुरू होती.
जिल्हा बँकेसाठी झाडून मतदान
By admin | Updated: May 6, 2015 00:24 IST