शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 पराभव दिसू लागल्यानेच सुडाचे राजकारण : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:11 IST

कोल्हापूर : पराभव दिसू लागल्यानेच सत्तेच्या जोरावर विरोधकांच्या घरांवर ऐन निवडणुकीत छापे टाकून सुडाचे राजकारण केले जात असल्याची घणाघाती ...

कोल्हापूर : पराभव दिसू लागल्यानेच सत्तेच्या जोरावर विरोधकांच्या घरांवर ऐन निवडणुकीत छापे टाकून सुडाचे राजकारण केले जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी रात्री येथील गांधी मैदानात झालेल्या सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक व खासदार राजू शेट्टी यांची संसदेतील कामांची दखल देशाने घेतली आहे. त्यामुळे अशा कर्तृत्ववान उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला लोक प्रचंड संख्येने उपस्थित होते. गांधी मैदान खचाखच भरले होते.या सभेमध्ये पवार यांनी मोदींना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल, प्रकाश आवाडे यांची उपस्थिती होती. पवार म्हणाले, ‘जगाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. भारताशेजारील काही राष्ट्रांमध्ये हुकूमशाही येत असताना भारतामध्ये मात्र ही लोकशाही टिकवून ठेवण्याचे काम तुम्ही सर्वसामान्य माणसांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देश वेगळ्या वाटेवरून नेण्याचे काम केले आहे. ज्यांनी मोदी यांना विरोध करण्याची भूमिका घेतली, त्या विरोधकांवर छापे टाकून सूड उगवला जात आहे. कनिमोळी, कमलनाथ, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी यांच्या अधिकाऱ्यांवर हे छापे टाकले जात आहेत. हे सुडाचे राजकारण सामान्य जनता सहन करणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या बुधवारी सकाळी अकलूज येथे झालेल्या सभेचा दाखला देत पवार म्हणाले, की या सभेला व्यासपीठावर सगळेच साखर कारखानदार होते; परंतु त्या सभेत मोदी यांनी माझ्यावर ‘पवार नुसते साखर-साखर करतात,’ अशी टीका केली.होय, मी साखर कारखानदारीच्या हिताचे रक्षण करणारा आहे; परंतु त्याचबरोबरीने गहू,तांदूळ पिकवणाºया शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली आहे. मी कोणत्याही कारखान्याचा संचालक नाही. परंतु उसाच्या चांगल्या जातीचे संशोधन करून शेतकºयांना अधिक उत्पन्न मिळवून देणाºया जगातील एका चांगल्या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी त्यांनी एअर स्ट्राईकवरून केले जाणारे राजकारण, नोटाबंदी, शेतकºयांच्या आत्महत्या अशा विविध प्रश्नांवरून मोदींना खडे बोल सुनावले.राज ठाकरे यांचे ‘लाव रे...’सभेत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याच्या काही क्लिप्स दाखवल्या; परंतु त्याची गुणवत्ता चांगली नसल्याने त्यातील एक क्लिप सुरूच झाली नाही. त्यात खूप वेळ गेला. राज ठाकरे हे‘ नुसतं लाव रे...’ असे म्हणताच एका सेकंदात क्लिप सुरू होते इतक्या चांगल्या दर्जाचे प्रक्षेपण राष्ट्रवादीला करता आले नाही....पोरगी देत नाहीतपवार म्हणाले, अमुक यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्हांला मत द्या, असे आता सांगितले जातेय. पण मुलगी दाखवायला गेल्यानंतर मुलाच्या बापाकडं बघून मुलगी देत नाहीत; तर मुलाकडे बघूनच मुलगी दिली जाते. त्यामुळे या प्रचाराकडे लक्ष देऊ नका.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक