शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सफाईच्या पैसे वसुलीवरून राजकारण

By admin | Updated: December 16, 2014 00:18 IST

इचलकरंजी पालिका : प्रस्ताव मंजूर करणारेच आता विरोध; काहींचा सभागृहात एक, तर बाहेर दुसरा पवित्रा

इचलकरंजी : घरोघरी कचरा गोळा करण्याकामी नगरपालिका घरफाळ्याबरोबर वार्षिक २४० रुपये जमा करण्याच्या प्रस्तावावर आता राजकारण चालू झाले असून, सभागृहात प्रस्तावाच्या बाजूनेच असलेले नगरसेवक आता विरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्षांनी सभागृहात एक, तर बाहेर दुसरा पवित्रा घेतला आहे.शहरातील ज्या वॉर्डामध्ये घरोघरी कचरा गोळा करणे, रस्ते-गटारी साफ करून कचरा वाहतूक करण्याकामी बचत गट व मक्तेदार यांच्यामार्फत सध्या सुरू असलेल्या कामांसाठी नागरिकांकडून नगरपालिकेमार्फत ठरविण्यात आलेल्या दराने शुल्क आकारणीबाबतचा विषय नगरपालिकेच्या १२ डिसेंबरच्या सभेत चर्चेत आला असताना या विषयास प्रथम सत्तारूढ व विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.त्यामुळे हा विषय नामंजूर करण्याचे ठरले; पण या विषयाबाबत खुलासा करताना मुख्याधिकारी सुनील पवार यांनी, गेले दोन वर्षे शासकीय लेखापरीक्षणामध्ये अशा प्रकारची शुल्क आकारणी केली नसल्याबद्दल आक्षेप घेण्यात आलेला आहे. हा विषय मंजूर न झाल्यास संबंधित नगरसेवकांना जबाबदार धरून नगरसेवकांकडून त्याची वसुली होईल, असे सांगितले.मुख्याधिकाऱ्यांच्या खुलाशानंतर काहीशा गोंधळात पडलेल्या नगरसेवकांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली नसली तरी वसुलीस विरोध दर्शविला नाही. तेव्हा दोन्ही बाजूच्या काही नगरसेवकांनी वसुलीबाबत काही उपाय सूचविले. संबंधित खासगी मक्तेदाराला नागरिक महिना वीस रुपयांची रक्कम देणार नाहीत. वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होतील. म्हणून नगरपालिकेच्या घरफाळ्यासोबत मागणी सूचना देऊन वार्षिक २४० रुपये वसूल करावेत आणि ती रक्कम संबंधित मक्तेदाराला अदा करावी, असे ठरविण्यात आले. शहरात असलेल्या साधारणत: ५० हजार कुटुंबीयांकडून ही रक्कम वसूल होणार आहे. साधारणपणे सव्वा कोटी रुपये इतकी रक्कम होते. (प्रतिनिधी)नागरिकांतून विरोधाची प्रतिक्रिया नगरपालिकेच्यावतीने सफाईची रक्कम वसूल होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत नागरिकांतून विरोधाची प्रतिक्रिया उमटू लागली. तसेच शहरातील मोबाईल संचावर, व्हॉटस् अ‍ॅपवरून तीव्र नाराजी असलेले मेसेज पसरू लागले. तसेच नागरिकही विरोधात बोलू लागल्याने आता नगरसेवकसुद्धा या प्रस्तावास विरोध करण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगू लागले आहेत. त्यामध्ये दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. पालिकेमध्ये भाजप घटक पक्ष असलेली शहर विकास आघाडी आहे. आज, सोमवारी भाजपचे एक शिष्टमंडळ नगरपालिकेत आले आणि त्यांनी सफाईसाठी नागरिकांकडून वार्षिक २४० रुपये वसुलीला विरोध दर्शविला. शहर अध्यक्ष विलास रानडे, दीपक राशिनकर, सुभाष मालपाणी, ऋषभ जैन, कमल तिवारी, शंकरराव तोरस्कर, आदींनी उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले व कामगार अधिकारी विजय राजापुरे यांना सुमारे अर्धा तास घेराव घातला होता. अशा प्रकारच्या राजकारणामुळे आता हा विषय गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.