शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी राजकीय पक्षांचा गृहपाठ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 01:15 IST

सध्या तरी स्वबळाची भाषा : आघाडीशिवाय पर्याय नसल्याने सर्वांच्याच हालचाली सावध

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक जरी पुढील वर्षी होणार असली, तरी सर्वच पक्षांनी आतापासूनच गृहपाठाला सुरुवात केली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्याने आता या दोन्ही पक्षांनाही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी आणि राष्ट्रवादी सत्तेतील सहभागासाठी ताकद लावणार आहे. मात्र, स्वतंत्र लढण्यासाठी कुणीही कितीही उड्या मारल्या तरीही आघाडीशिवाय पर्याय नसल्याने या हालचालीही सावधपणे सुरू आहेत. पुढील वर्षी मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या सध्याच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने ६९ पैकी सर्वाधिक ३१ जागा मिळवत खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ची साथ घेत सत्ता संपादन केली. त्याआधीच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेत वाटा दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेकडे फिरकूही दिले नाही. गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्णातील राजकारणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिथे संधी मिळेल तेथे भाजपच्या कार्यक र्त्याला संधी देण्याची भूमिका असलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य कसे वाढतील याच्या जोडणीत संघटनमंत्री बाबा देसाई यांना घेऊन लागलेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामीण भागात पाच आमदार आहेत. त्यांच्या शक्तीवर शिवसेना आश्वासक आहे. जिल्ह्णाचे ताकदवान नेतृत्व असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे सध्या भाजपच्या जवळ आहेत. राष्ट्रवादी आणि दोन्ही काँग्रेस आपले सर्वाधिक सदस्य कसे निवडून येतील यासाठीच्या नियोजनात आहेत. जनसुराज्य, स्वाभिमानी व अन्य छोट्या-मोठ्या आघाड्या, गट हे कुणाबरोबर तरी संगत करूनच या राजकारणामध्ये सक्रिय राहणार आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तीन तालुक्यांतील कुणाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतात यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. अजून आरक्षण पडलेले नाही. एकदा आरक्षण पडले की मग पुढच्या हालचाली वेगावणार आहेत.