शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

सतेज यांच्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:38 IST

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार लाभली आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार ...

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या वाढदिवसाला राजकीय ईर्ष्येची किनार लाभली आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी घेतलेल्या थेट महाडिक विरोधी भूमिकेस जिल्ह्यांतील किती प्रमुख नेत्यांचे पाठबळ आहे याची रंगीत तालीमच वाढदिवसाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. त्यामुळेच कसबा बावड्यात वाढदिवसाच्या कमानीवरील शुभेच्छांची जागा ‘आमचं ठरलंय..’ या त्यांच्या टॅगलाईनने घेतली आहे.गेल्या महिन्याभरापासून आमदार पाटील यांनी कोल्हापूर मतदारसंघ पिंजून काढला आहे. स्वत: उमेदवार असल्याप्रमाणेच ते सभा, व्यक्तिगत गाठीभेटी, जोडण्या लावण्यात व्यस्त आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचार सुरू केल्यावर त्याची हवा तयार झाली आहे. शिवसेना-भाजप जेवढी महाडिक यांच्यावर टीका करत नाहीत तेवढी प्रखर टीका आमदार पाटील हे करत आहेत. गेल्या आठवड्यापासून ‘गुलाल हीच वाढदिवसाची भेट!’ अशा स्वरूपातील संदेश सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक आणि ग्रुपच्या व्हॉट्स अ‍ॅपचा डीपी आणि फेसबुक प्रोफाईल ‘आमचं ठरलंय’ झळकत आहे. वाढदिवसानिमित्त वह्या संकलन, रक्तदान शिबिर, बालकल्याण संकुलातील मुला-मुलींना गणवेश वाटप, क्रिकेट आणि हॉकी स्पर्धा, असे उपक्रम राबवले जाणार आहेत.