शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गाच्या संख्येमुळे राजकीय प्रारूप बदलले : अशोक चौसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:30 IST

इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील ...

इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील अनेक देशांत गेल्या दोन-तीन दशकांत असे घडताना दिसत आहे. तसेच भारतातही वर्गाची जागा आता जातींनी व्यापली आहे. देशातील ४० कोटी मध्यमवर्गाचे सोशल प्रोफाईल बदलले आहे, हे भारतीय राजकारणाच्या बदलत्या दिशेमागील मुख्य वास्तव आहे. नव्याने पुन्हा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप आघाडी सरकारला मिळालेल्या जनादेशामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.येथील समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात ‘भारतीय राजकारणाची बदलती दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. एफ. पाटील होते. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे सहवक्ते होते.यावेळी डॉ. चौसाळकर म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत कोणताही जनादेश कायमस्वरूपी नसतो. तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सक्षम सरकारी यंत्रणा - दळणवळणाची सुविधा, मत देणे व मोजणीसाठीची मशिनरी उपलब्ध असूनही निवडणूक प्रक्रिया दीर्घकालीन करणे आणि आचारसंहितेकडे काटेकोर लक्ष न देता सत्ताधार्जीण वर्तन करणे, ३७० कलम बदलण्यापासून ते घटना दुरुस्तीपर्यंतची प्रक्रिया, अशा विविध मुद्द्यांवर मांडणी केली.प्राचार्य मेणसे म्हणाले, संसदीय लोकशाही पद्धतीऐवजी ‘नमो विरुद्ध रागा’ असे स्वरूप जाणीवपूर्वक आणले गेले; पण ते चुकीचे आहे. ती अध्यक्षीय पद्धती व हुकूमशाहीकडे नेणारी पावले आहेत. स्वायत्त संस्था मोडीत काढल्या जात आहेत. विरोधकांशी सुडाने वागले जात आहे. भारतीय राजकारणाची बदलती दिशा घातक आहे. ती बदलायची असेल, तर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेऊन संघटितपणे व जागरूकपणे काम केले पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, डॉ. चिदानंद आवळेकर, अस्लम तडसरकर, प्रा. डी. डी. चौगुले, डॉ. सुनील कांबळे, सुनील इनामदार, आदींनी मनोगत व्यक्त केले.चर्चासत्रास कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव या जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आभारमानले.