शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गेळवडेत राजकीय वादातून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:58 IST

मलकापूर/कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या गटात रविवारी सकाळी जोरदार ...

मलकापूर/कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या गटात रविवारी सकाळी जोरदार मारामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी तलवार, काठ्या, दगड, दांडक्याने केलेल्या हल्ल्यात आठजण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या मारामारीमुळे गावात तणाव पसरला असून, सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांचा हात तुटल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.अधिक माहिती अशी, गेळवडे येथील ग्रामपंचायत निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली आहे. त्यापासून येथील दोन राजकीय गटांत सतत वादावादीचे प्रकार घडत आहेत.तीन दिवसांपूर्वी सीताराम लाडयांच्या मामाच्या मुलाला मारहाण केली होती.तसेच त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही मारहाण झाली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी मुंबईहून सीताराम लाड व त्यांचे कार्यकर्ते विरोधी गटाचे तानाजी पाटील व बाळकू पाटील यांच्याकडे रविवारी सकाळी गेले. यावेळी लाड आणि पाटील गटांत जोरदार राडा झाला. तानाजी पाटील, शरद पाटील, बाळकू पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने सीताराम लाड यांच्यावर वार केला. त्यामध्ये लाड यांचा हात तुटून ते गंभीर जखमी झाले; तर आठजण जखमी झाले. दोन गटांत राडा झाल्याने गावात तणाव निर्माण झाला. जखमींना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. घटनेची माहिती समजताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गावात रात्री उशिरापर्यंत सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सीपीआर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शाहूवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.