शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:40 IST

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीची कमान ताब्यात ठेवण्यासाठी गावागावांत कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने या पदाच्या उमेदवारांचा कस लागणार आहे. त्यामुळे मतदारांना चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींच्या ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीची कमान ताब्यात ठेवण्यासाठी गावागावांत कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने या पदाच्या उमेदवारांचा कस लागणार आहे. त्यामुळे मतदारांना चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सतरा पैकी अब्दुललाट व लाटवाडीची निवडणूक २७ आॅक्टोबरला होत आहे. औरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या पंधरा ग्रामपंचायतींची निवडणूक १६ आॅक्टोबरला होत आहे.पंधरा ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामात पावसाच्या मोसमात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाने राजकीय वातावरण तापले आहे. गावागावांत सरपंचपदासाठी डावपेच आखले जात असून, स्थानिक गट-तट पातळीवर या निवडणुका होत असल्याने नेत्यांनी रणनीती अद्याप उघड केलेली दिसत नाही. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुकांची तहसील कार्यालयावर गर्दी होत आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट गावामधून होणार असल्याने चुरस दिसत आहे.