शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर खुनी हल्ला; तिघांना अटक

By admin | Updated: September 26, 2016 00:58 IST

सीबीएसवर किरकोळ वादातून घडला प्रकार

कोल्हापूर : ठाणे शहर पोलिस दलातील पोलिस समीर सदाशिव बेलेकर (वय २५, रा. सडोली खालसा, ता. करवीर) यांच्यावर शनिवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघा तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी प्रज्वल दिनेश देवरीकर (वय १९), निरंजन सतीश घाडगे (२६), विशाल प्रकाश वडर (१९, सर्व रा. राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. समीर बेलेकर हे ठाणे शहर येथे पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. अर्जित रजा घेऊन ते ठाण्याहून गावी जाण्यासाठी बसने शनिवारी रात्री साडेअकराच्यासुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. या ठिकाणी गावी जाणाऱ्या बसची चौकशी केली असता त्यांना बस नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी गावाकडील मित्राला फोन करून येथे येण्यास सांगितले. तोपर्यंत नाष्टा करून दाभोळकर कॉर्नरकडे जात असताना सह्णाद्री हॉटेलजवळ मोटारसायकलवरूनआलेल्या तिघा तरुणांनी मोटारसायकल त्यांना घासून नेली. त्यांना ते ‘गाडी सरळ चालवा’ असे म्हणाले. यावेळी ‘बघतोस काय?’ म्हणून त्यांनी त्यांच्याशी वादावादी केली व त्यांच्यावर चाकूने वार करून ते पळून गेले. जखमी बेलेकर यांना नागरिकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. शाहूपुरी पोलिसांना स्टेशन रोडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघा तरुणांचे फुटेज मिळून आले. मोटारसायकलचा क्रमांक व फुटेजवरून काही तासांतच त्यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रज्वल देवरीकर याने चाकूने वार केल्याची कबुली दिली. हे तिघे नेहमी स्टेशन रोड परिसरात फिरत असतात. त्यांनी यापूर्वी येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी यापूर्वी कधी प्रवाशांना धाक दाखवून लूटमार केली आहे का, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)