शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची पालखी टेंबलाईवर

By admin | Updated: August 5, 2015 00:03 IST

त्र्यंबोली यात्रा : ‘पी ढबाक्’चा गजर; राजाराम महाराज यांच्या काळापासून प्रथा कायम

कोल्हापूर : आषाढातल्या तिसऱ्या मंगळवारी पोलीस मुख्यालयातील पालखी... ‘पी ढबाक्’चा गजर आणि काही मंडळांच्या डॉल्बीच्या दणदणाटात त्र्यंबोली यात्रा झाली. शहरातील पेठा-पेठांतून, तरुण मंडळांच्यावतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले. आषाढातल्या तिसऱ्या मंगळवारी पोलीस मुख्यालयातील पालखी टेंबलाई टेकडीवर जाते. त्याशिवाय त्र्यंबोली यात्रेचा पुढचा सोहळा होत नाही अशी प्रथा आहे. राजाराम महाराजांच्या काळात टेंबलाई देवीचा मुखवटा मुख्यालयातील १ नंबर खोलीत नेला जायचा. यात्रेच्या आदल्या दिवशी टेकडीवरील गुरव मुख्यालयात येऊन भजनाचा कार्यक्रम करून पहाटे तो घेऊन जात, अशी राजाराम महाराजांच्या काळातील दस्तावेजांमध्ये नोंद आहे. आजदेखील ही परंपरा चालू आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील पालखी टेंबलाई मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.याशिवाय शहरातील विविध पेठांमधून, तालीम, मंडळे यांच्यावतीने ‘पी ढबाक्’च्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात कुमारिका व सुवासिनी महिला नदीचे नवीन पाणी भरलेली कळशी डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही वर्षांत त्र्यंबोली यात्रेला डॉल्बी लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे काही मंडळांनी ‘पी ढबाक् ’ या पारंपरिक वाद्यांऐवजी डॉल्बीच्या दणदणाटात त्र्यंबोली यात्रा काढल्याचे चित्र शहरात दिसत होते. त्यानंतर मंगळवार आणि शुक्रवार मिळून आणखी पाच वार त्र्यंबोली यात्रेसाठी मिळणार आहेत. त्यामुळे ज्या पेठांनी किंवा गल्ल्यांमधील मंडळांनी अद्याप यात्रा काढलेली नाही त्यांच्यावतीने वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)