शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात पोलिसांचे राहणार डिजिटल पेट्रोलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:20 IST

कोल्हापूर : नव्या वर्षात गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी शहर व परिसरात डिजिटल पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चारही पोलीस ...

कोल्हापूर : नव्या वर्षात गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी शहर व परिसरात डिजिटल पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्यांना प्रत्येकी एक मोबाईल व्हॅन व चार दुचाकी गस्त घालण्यासाठी देण्यात येणार आहेत. या यंत्रणेद्वारे २४ तास गस्त घालण्यात येऊन त्याचे नियंत्रण हे पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूममध्ये असेल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी दिली.

नव्या वर्षात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने ज्येष्ठांची फसवणूक, तोतया पोलिसांकडून होणारी फसवणूक, चोऱ्या, चेन स्नॅचिंग अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणेद्वारे २४ तास गस्त ठेवण्याचा उपक्रम पोलीस दलातर्फे नव्याने सुरू करण्यात येत आहे. या विशेष गस्तीचे नियंत्रण हे नियंत्रण क़क्षात (नं. १००) कडे असेल. तीन सत्रांत होणारी ही गस्त विशेषत: गर्दीच्या ठिकाणांसह ठरावीक उपनगरांत निर्जन स्थळी घालण्यात येणार आहे.

गस्त वाहनांना असेल ‘क्यूआर कोड’

गस्तीच्या वाहनांना क्‍यूआर कंट्रोलिंग असल्याने संबंधित बीट मार्शलकडून कोणत्या भागात किती वेळ गस्त घातली, तारीख, वेळ व ठिकाणानुसार नोंदींची माहिती एकत्रित संकलित होणार आहे. शिवाय नियंत्रण कक्षात फोन नं. १००वर आलेल्या तक्रारींचे निरसन केले का? याच्यावरही वरिष्ठांकडून अंकुश राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

दोनशे पॉईंटवर विशेष नजर

शहरात गर्दीचे व संवेदनशील असे सुमारे २०० पॉईंट गस्तीसाठी निश्‍चित केले आहेत. शाळा, महाविद्यलयांचाही या पॉईंटमध्ये समावेश आहे. ठरवून दिलेल्या दिवशी व निश्‍चित वेळेत संबधित वाहनांद्वारे गस्त घातली जाईल.

२० पोलीस चौक्या कार्यरत

बंद असलेल्या जिल्ह्यातील २० पोलीस चौक्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून त्या कार्यरत होतील. शहराच्या प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त कायम राहणार आहे.

कोट ...

गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी शहर परिसरात चार मोबाईल व्हॅनसह १६ दुचाकींवरून पोलीस २४ तास गस्त घालणार आहेत. गस्तीची सर्व वाहने नियंत्रण क़क्षाला जोडण्यात येणार आहेत.

- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा