शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी फिरवली पाठ अन् बागेची लागली वाट

By admin | Updated: February 10, 2015 23:52 IST

मुरगूड पोलीस ठाण्याच्या आवारातील स्थिती : लोकसहभागातून उभारलेली बाग नष्ट होण्याच्या मार्गावर

मुरगूड : मुरगूड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या समोरील बाजूस तत्कालीन अधिकारी व पोलिसांनी लोकसहभागातून उभा केलेली सुसज्ज बाग पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना शासनाच्याच अधिपत्याखाली काम करणाऱ्या अधिकारी व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाडेच नाहीशी होण्याची वेळ आल्याने पोलीस ठाण्यासमोरील बागेची अवस्था ‘पोलिसांनी फिरविली पाठ अन् बागेची लागली वाट’ अशीच झाली आहे. मुरगूडचे पोलीस ठाणे स्थापनेपासून गावभागामध्ये असणाऱ्या जुन्या छोट्याशा इमारतीमध्येच होते. शासनदरबारी प्रयत्न झाल्याने सहा वर्षांपूर्वी पोलीस कॉलनीच्या विस्तीर्ण जागेमध्ये सुसज्ज इमारत उभा राहिली आणि लागलीच पोलीस ठाण्याचा बिस्तारा नवीन इमारतीमध्ये हलविला गेला. इमारतीच्या आजूबाजूला ओसाड प्रदेश असल्याने सुने-सुने अशीच अवस्था ठाण्याची होती; पण त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे दत्तात्रय भापकर यांनी ठाण्याच्या इमारतीच्या बाजूला बगिचा निर्माण करण्याचा संकल्प केला. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन करून त्यांनी बगिचा करण्यास सुरुवात केली. सुरू असलेले काम पाहून स्वखुशीने शहरातील काही लोकांनी माती आणण्याचे काम केले. काहींनी शोभेची झाडे, फळझाडे, काहींनी मोफत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला. सर्वांच्या सहकार्याने ओसाड दिसणारा प्रदेश अगदी हिरवाईने नटून गेला. तसेच कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पालिकेने पाण्याचे कनेक्शन दिले. जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी चोहोबाजूंनी संरक्षक कुंपणही उभा केले; पण गेल्या काही महिन्यांपासून बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने बागेतील झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कुंपणही गायब झाले आहे. पाणी न मिळाल्याने फळझाडे, फुलझाडे वाळून गेली आहेत. कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. बागेतील गवत गुडघ्यापर्यंत वाढले आहे. कहर म्हणजे बागेतील गवत नाहीसे करण्यासाठी आग लावली. आणखी काही दिवस दुर्लक्ष झाले तर ही बाग येथे होती यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. कायद्याच्या कचाट्यातून थोडेसे बाजूला होऊन आपण या ठिकाणी काम करतो आहे ते ठिकाण चांगले करण्यासाठी थोडासा वेळ काढून सध्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बागेकडे लक्ष दिल्यास आहे त्यापेक्षा नक्कीच एक डौलदार बाग निर्माण होईल, अशीच आशा यानिमित्ताने बाळगूया.