शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसमामांच्या घरांना अवकळा

By admin | Updated: October 21, 2014 23:41 IST

सार्वजनिक हॉल धोकादायक स्थितीत

अतुल आंबी -इचलकरंजी -चोवीस तास समाज रक्षणासाठी दक्ष राहावे लागणाऱ्या पोलिसांच्या घरांची दुरवस्था झाल्याने त्यांची झोप (विश्रांती) उडाली आहे. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी अवस्था पोलिसांची बनली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. -येथील थोरात चौकात असलेल्या पोलीस क्वॉर्टर्समधील सात इमारतींमध्ये एकूण १०२ सदनिका आहेत. त्यालगत अधिकाऱ्यांसाठी तीन स्वतंत्र इमारती आहेत. सुमारे २४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस त्यांची दुरवस्था वाढत गेली. अनेक सदनिकांमध्ये पाण्याची गळती, ड्रेनेजची गळती व पडझड झाल्याने सध्या तेथे फक्त ३६ कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत राहतात. सध्या अनेक सदनिकांना दरवाजे, खिडक्या नाहीत. फरशा खराब झाल्या आहेत. भिंतीसह स्लॅबचा गिलावा पोकळी धरत असल्याने त्याचीही पडझड होत आहे. इमारतींवर झाडे उगवली आहेत. त्यांची मुळे भिंतीत घुसल्यामुळे या इमारती कधीही ढासळू शकतात, अशी अवस्था झाली आहे. चार मजली इमारती असल्या तरी अनेक इमारतींमध्ये पडझड झाल्याने दोनच मजल्यांपर्यंत राहण्यासारखी अवस्था आहे.गेल्या वर्षी ६० लाख रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्यामध्ये आठच खोल्यांची दुरुस्ती होऊ शकली. त्यामध्ये काही खोल्या आतून पाडून एकत्र करून थोड्या मोठ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित सदनिका तशाच दुरवस्थेत आहेत. अनेक सदनिकांची ड्रेनेज लाईन खराब झाल्याने शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. चौथ्या मजल्याच्या टेरेसवर बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या खराब झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या बसविल्या. मात्र, पाईपलाईनची दुरवस्था झाल्याने प्रत्येक मजल्याला पाणीपुरवठा विस्कळीतपणे होतो. घरामध्ये समाधान असल्यास पोलीस ड्यूटीवर चांगली कामगिरी करू शकतो. मात्र, परिवारातील सदस्य नेहमी धोकादायक स्थितीत राहत असतील, तर त्या पोलिसांची मानसिकता काय होत असेल? समाजातील वेगवेगळ्या कामाचा ताण सहन करून विश्रांतीसाठी घरी गेल्यावर घराची दुरवस्था पाहून थकवा दूर होण्याऐवजी वाढतोच. त्यामुळे अनेक व्याधींना पोलिसांना सामोरे जावे लागते. त्यामुळे काही कर्मचारी अशा क्वॉर्टर्समध्ये राहण्याऐवजी शहरात अन्यत्र भाड्याने राहतात, तर काहीजण परगावाहून ये-जा करतात. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे.सार्वजनिक हॉल धोकादायक स्थितीतपोलीस क्वॉर्टर्सलगत सुमारे दहा वर्षांपूर्वी एका सार्वजनिक हॉलचे बांधकाम करण्यात आले. गोडाऊनसारख्या बांधण्यात आलेल्या या हॉलची संरक्षण भिंत एका ट्रक अपघातात पडली. त्यानंतर ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे झाल्याने काही लोकांनी तेथील विटा व अन्य साहित्य पळविले आहे. या हॉलच्या एका बाजूच्या भिंतीची जास्तच दुरवस्था झाल्याने हा हॉल कधीही कोसळू शकतो, अशा धोकादायक स्थितीत आहे.