शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:24 IST

उत्कृष्ट कामगिरीचा गौरव : स्थानिक गुन्हे अन्वेषणला ५० हजारांचे बक्षीस

कोल्हापूर : खून, घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी कणेरीमठ चोरी व आजरा जळीत गाडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास रोख ५० हजारांचे बक्षीस देण्यात आले. पोलिस प्रशासनातर्फे केलेल्या गौरवाने अधिकारी व कर्मचारी भारावून गेले. कणेरी (ता. करवीर) येथील परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठावरील जुन्या निवासस्थानात झालेली चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने उघडकीस आणली. याप्रकरणी अट्टल चोरटा लखन कृष्णा माने (वय २२, रा. वंदूर, ता. कागल) याला अटक केली. आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारमध्ये जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उलघडून याप्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. या दोन्हीही घटना संवेदनशील होत्या. पोलिसांना तपास करणे आव्हानात्मक होते; परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला. गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणल्याने पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी या पथकाचे अभिनंदन करून त्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव केला. त्यामध्ये गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील, करवीरचे पोलिस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, सहा. पोलिस निरीक्षक विकास जाधव, रमेश खुणे, रवींद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित, सचिन मिरधे, सुशीलकुमार वंजारे, सहा. फौजदार विजय कोळी, कॉन्स्टेबल एस. एन. खोराटे, वाय. एस. उपराटे, एस. आर. हुंबे, एस. एम. ढवळे, एस. डी. कुंभार, एस. जे. काशीद, पी. बी. संकपाळ, जे. ए. भोसले, पी. एस. माने, ए. व्ही. बंद्रे, एस. एस. पाटील, आर. बी. शिटे आदींचा समावेश आहे. ( प्रतिनिधी)