शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

साठ सावकारांवर पोलिसांची नजर चौकशी सुरू : तथ्य आढळल्यास गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:57 IST

टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे साठ खासगी सावकारांविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे तक्रारी

एकनाथ पाटील।कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे साठ खासगी सावकारांविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. त्यानंतर व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जात आहे. गरीब लोकांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. दरमहा ५ ते १० टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देताना कर्जदार हतबल होत आहे.

जिल्ह्यात खासगी सावकारांचे पेव फुटल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक मोहिते यांनी, जिल्ह्यात सावकारांकडून ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडे सावकार वसुलीसाठी तगादा किंवा दमदाटी करीत असतील तर नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. सावकारांच्या धमकीला बळी पडू नये, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन केले होते.

त्यानुसार हुपरी, भुदरगड, गारगोटी, इचलकरंजी, जयसिंगपूर, शहापूर, शिरोळ, कागल, चंदगड, आजरा, करवीर, कोडोली, सातवे, पन्हाळा, कोतोली, कळे, वडणगे, शिये, शिरोली एम. आय. डी. सी., गांधीनगर, वळिवडे, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव, उचगाव, पाचगाव यांसह शहरातील कावळा नाका, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, विक्रमनगर, वारे वसाहत, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, बोंद्रेनगर, आर. के. नगर, सदर बझार, आदी ठिकाणांहून साठ सावकारांच्या विरोधात अर्ज दाखल झाले आहेत. पोलिसांकडून प्रत्येक अर्जाची कसून चौकशी सुरू आहे.शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे.गरीब लोकांचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. 

जिल्ह्यातील खासगी सावकारकी मोडून काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार रोज तीन-चार अर्जांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा