शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची खाबूगिरी पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 23:29 IST

रौप्यनगरीची बदनामी : वर्षभरात सात कर्मचाऱ्यांवर खंडणी, लाचखोरी प्रकरणात कारवाई

तानाजी घोरपडे -- हुपरी--अवघ्या एक वर्षाच्या काळामध्ये हुपरी (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्यातील सात पोलिस कर्मचाऱ्यांना खंडणी व लाचखोरी प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईस सामोरे जाऊन घरचा रस्ता धरावा लागला. या सर्व घटनांतून हुपरी पोलिसांची खाबूगिरी समोर येत आहे. संपूर्ण देशात रौप्यनगरी असा नावलौकिक असलेल्या चमचमत्या चंदेरी शहराच्या पोलिस ठाण्याच्या काळ्याकुट्ट कारभारामुळे शहराच्या नावलौकिकास मात्र पोलिसांच्या या कृत्यामुळे काळिमा फासला जात आहे.हुपरी व परिसरातील गावागावांत सुरू असणारा चांदी व्यवसाय, जवाहर साखर कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत याबरोबरच दिवसेंदिवस वाढत चाललेले औद्योगिकीकरण यामुळे परिसराचा ग्रामीण बाज लोप पावला जात असून, शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. या सर्व घडामोडीबरोबरच समाजाला घातक ठरणारा अवैध व्यवसाय व गुन्हेगारीकरणही मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. मटका, गुटखा, हातभट्टी, वडाप व्यवसाय व जुगार अड्ड्यांना तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावगुंडांना संरक्षण देण्याच्या मोबदल्यात पोलिस ठाण्याला मिळणारी प्रति महिना लाखो रुपयांची ‘एंट्री’ हा एक समाजाचा चर्चेचा विषय होऊन गेला आहे. ही एंट्री गोळा करण्याचे (कलेक्टरचे) काम आपल्याला मिळावे यासाठी अनेकवेळा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पोलिस ठाणे प्रमुखाची आपल्यावर मर्जी जडावी व आपल्याला त्यांचा खास जवळचा म्हणून ओळखण्यात यावे यासाठी पोलिसांची अक्षरश: चढाओढ सुरू असते. परिणामी पोलिस ठाण्यात सरळ सरळ मर्जीतले व गैरमर्जीतले असे दोन गट पडल्याचे त्यांच्या बोलण्यातून अगदी सहजपणे समजून येते. पोलिस ठाण्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांनाही नाचविण्यात येते. वरकमाईला सोकावलेल्या या बहाद्दरांना सर्वसामान्य लोकांच्या परिस्थितीचे जराही काही देणे घेणे किंवा सोयरसूतक नसते. लाचखोरी व खंडणीच्या घटना घडूनही वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करीत नाहीत. परिणामी हुपरी पोलिस ठाणे कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षेत्रात आहे की नाही, अशी चर्चा सर्वसामान्य ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.